कुणकेरीतील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणकेरीतील भवानी मातेचा
त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात
कुणकेरीतील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात

कुणकेरीतील भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात

sakal_logo
By

21152
कुणकेरी ः भवानी देवीच्या गोंधळाला उपस्थित भाविक.

कुणकेरीतील भवानी मातेचा
त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात
सावंतवाडी ः कुणकेरी येथील समस्त सावंत-भोसले समाजाचे कुलदैवत श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवारी भक्तिमय वातावरणात अलोट गर्दीत उत्साहात पार पडला. यावेळी ठिकठिकाणाहून समस्त सावंत-भोसले व भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. कुणकेरी-भवानीवाडी येथे समस्त सावंत-भोसले समाजाचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेचे मंदिर आहे. या भवानीचा दर तीन वर्षानी गोंधळ उत्सव होतो. यावर्षी मंगळवारी १० मे रोजी झाला. सकाळपासूनच भाविकांची पाऊले कुणकेरी भवानीवाडीकडे वळली होती. ग्रामस्थ, मानकरी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले व श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनीही देवीचे दर्शन घेतले. दिवसभर भक्तांची मांदियाळी सुरू असताना धार्मिक कार्यक्रमही पार पडले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57181 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top