मधमाश्यांच्या पेट्यांबाबतचा दावा खोटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधमाश्यांच्या पेट्यांबाबतचा दावा खोटा
मधमाश्यांच्या पेट्यांबाबतचा दावा खोटा

मधमाश्यांच्या पेट्यांबाबतचा दावा खोटा

sakal_logo
By

L21104

- प्रेमानंद देसाई

मधमाश्यांच्या पेट्यांबाबतचा दावा खोटा
प्रेमानंद देसाई ः फसवणूक थांबवण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ ः मधमाश्यांमुळे हत्ती पळतात, असा दावा करून सुरू केलेला पैसे कमावण्याचा धंदा आधी बंद करा, असा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि केर ग्रामस्थ प्रेमानंद देसाई यांनी दिला आहे. मधमाश्यांना घाबरून हत्ती पळतात, असा तुमचा दावा असेल, तर ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच भागात येतात कसे? असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. शेतकरी, वन विभाग आणि शासनाची दिशाभूल करून लाखो रुपये लाटले जात असून, संबंधित ट्रस्टविरुद्ध रितसर तक्रार करणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.
केर, मोर्ले, बांबर्डे आदी हत्तींचा वावर असलेल्या गावात एका ट्रस्टकडून मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्या पेट्या धक्क्याने अथवा खाली पडून उघडल्यानंतर माश्या बाहेर पडतात आणि त्यांच्या आवाजाने हत्ती पळतात, असा ट्रस्टचा दावा होता. केर येथे रविवारी (ता. ८) सकाळी हत्तीच्या धक्क्याने पेटी पडून मधमाश्या बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे तेथे वावर असलेला हत्ती पळून गेला, असा दावा संबंधित ट्रस्टच्या लोकांनी गावकरी व वन कर्मचाऱ्यांकडे केला होता. दरम्यान, केरहून मोर्लेकडे गेलेले हत्ती पुन्हा मंगळवारी (ता. १०) केरमध्ये आले. त्यामुळे मधमाश्यांमुळे हत्ती पळतात, हा त्यांचा दावा फोल ठरला, असे श्री. देसाई यांना सांगितले. याबाबत त्यांनी संबंधितांशी संपर्क करून मधमाश्यांमुळे हत्ती पळतात तर ते पुन्हा कसे आले, असा प्रश्‍न विचारला. तसेच अन्य उपायांप्रमाणे हाही उपाय फसल्याने आपण आपल्या गावात मधमाश्यांच्या पेट्या बसवू नयेत. आपण तसे पत्र उपवनसंरक्षक आणि वनक्षेत्रपालांना देतो, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
.................
हत्तीची खबरदारी
हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. त्याची स्मरणशक्ती तीव्र असते. त्यामुळे कुठल्या वाटेवर पेट्या आहेत, हे त्याला पक्के माहीत असते. पेटीला धक्का लागला तर ती उघडते आणि मधमाश्या बाहेर पडतात, हे त्याला कळत असल्याने ते पेटीला धक्का न लावता मार्गक्रमण करण्याची दक्षता घेतात. त्यामुळे मधमाश्यांच्या पेट्या हत्तींना रोखण्यापेक्षा माणसांना रोजगार देण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57182 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top