कणकवली : नाईक माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : नाईक माहिती
कणकवली : नाईक माहिती

कणकवली : नाईक माहिती

sakal_logo
By

कणकवली शहरामधील
स्ट्रीट लाईटसाठी ३० लाख

नाईक ः बिजलीनगर, नाथ पै नगरचा समावेश

कणकवली, ता.११ : शहरातील बिजलीनगर आणि नाथ पै नगर येथील स्ट्रीट लाईट कामांसाठी ३० लाखाचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी आज ही माहिती दिली.
नाईक म्‍हणाले, शहरातील बिजलीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मराठा मंडळ रोड स्मशानभूमीपर्यंत स्ट्रीट लाईट बसवणे कामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तर महाडेश्वर रुग्णालय ते नाथ पै नगर गणपती सान्या पर्यंत स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी २० लाख मंजूर झाले आहेत. राज्‍य शासनाच्या नागरी सहाय्य योजने अंतर्गत विकास कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. बिजलीनगर आणि नाथ पै नगर येथील स्ट्रीट लाईट कामासाठी येथील नगरसेविका मानसी मुंज यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधी मंजूर करून आणला आहे. त्‍यामुळे शहराच्या वर्दळीच्या या भागात स्ट्रीट लाईट सुरू होणार असल्‍याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्‍यान, शहरातील अन्य विकासकामांसाठीही शिवसेनेकडून पाठपुरावा सुरू असल्‍याचे नाईक म्‍हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57195 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top