मसुरेत त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसुरेत त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात
मसुरेत त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात

मसुरेत त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात

sakal_logo
By

L२१११०

ओळ - मसुरे ः येथे सावंत-इंदरकर मंडळींचा त्रैवार्षिक गोंधळ साजरा झाला.

मसुरेत त्रैवार्षिक गोंधळ उत्साहात
अंबाबाईचा गजर ः हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ११ ः मसुरे-देऊळवाडा (ता. मालवण) येथे इंदरकर-सावंत सहाय्यक समाज मंडळाच्यावतीने श्री देव रवळनाथ मंदिर आई तुळजाभवानीचा त्रैवार्षिक गोंधळ नुकताच धार्मिक वातावरणात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ''आई उदे उदे उदे गं अंबाबाई''च्या नामघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी मुंबईकर चाकरमानी, ग्रामीण सर्व सावंत मंडळी आणि सुहासिनी, माहेरवाशिणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नवस बोली, नवसफे़ड तसेच ओट्या भरण्यासाठी गर्दी झाली होती. भाविक शिस्तबद्धतेने मातेचे दर्शन घेत होते. इंदरकर-सावंत मंडळीने गोंधळाचे चोख नियोजन केले होते. मंदिरासभोवती केलेली आकर्षक विद्युत रोषणाई खास आकर्षण ठरली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झालेत. मेढावाडी येथील कुलदेवता मंदिरात लोपाचार (होमहवन), देव तरंग काठी पावणाई मंदिर येथून सवाद्य श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्री देवी भवानी भेटीसाठी आली होती. अग्रपूजा व तुणतुणे पूजा, मांड व गोंधळ विधी, प्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. गोंधळ विधी प्रसंगी रात्री महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. यासाठी गावातील देवस्थान प्रमुख प्रभुगावकर बंधू, देवस्थानचे सर्व मानकरी, इंदरकर-सावंत बंधू, कमिटी सदस्य, प्रशासनाचे अधिकारी, इंदरकर सावंत सहाय्यक, समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व मानकरी यांनी विशेष मेहनत घेतली. रवळनाथ मंदिर येथे प्रमुख मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मसुरे येथे होणारा इंदूरकर- मंडळींचा हा गोंधळ प्रसिद्ध असून, हजारो भाविक पस्थित राहून होऊन मातेचे दर्शन घेतात.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57200 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top