बोगस बदली पासप्रकरणी बरेगरांचे आज उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस बदली पासप्रकरणी
बरेगरांचे आज उपोषण
बोगस बदली पासप्रकरणी बरेगरांचे आज उपोषण

बोगस बदली पासप्रकरणी बरेगरांचे आज उपोषण

sakal_logo
By

जयंत बरेगरांचे
आज उपोषण
सावंतवाडी, ता. ११ ः खोटे व बनावट कागदपत्र तयार करून खोट्या स्वाक्षरी करून बोगस बदली पास निर्माण केल्याची तक्रार करत माणगाव येथील तत्कालीन वनपालावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार हे उद्या (ता.१२) पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबातची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे.
बदली पास घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार जोडत श्री. बरेगार यांनी माणगाव येथील तत्कालीन वनपालांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्षभर लावून धरली आहे; मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बरेगारांनी यासंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देत संबंधितावर ११ मेपर्यंत गुन्हा दाखल करा, अन्यथा उपोषणास बसणार, असे संबधितांना कळविले होते; मात्र याबाबत काहीच हालचाली न झाल्याने अखेर उपोषणास बसण्याचा निर्णय बरेगार यांनी घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57203 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top