संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ ला व्याख्यान
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या शिवाजीनगर येथील सभागृहात रविवारी (ता. १५) मे रोजी दुपारी साडेचार वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाला रत्नागिरी शहर ज्य़ेष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी तसेच अन्य ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित राहावे, असे आवाहन नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.
------
संस्कृतीतर्फे कोकण सुदंरी स्पर्धा
रत्नागिरी ः येथील संस्कृती ग्रुपच्या वतीने २९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मारुती मंदिर येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात कोकण सुंदरी या सौंदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील मुलींना दूरचित्रवाहिनी, चित्रपट, मॉडेलिंग क्षेत्राची कवाडे खुली व्हावीत, त्यांना चांगले व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने गेली सात वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. १० मे पासून स्पर्धकांसाठी प्रवेशिका उपलब्ध होतील. १८ मे अंतिम तारीख असणार आहे. या स्पर्धेत कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांना सहभागी होती येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्कृती ग्रुपचे अध्यक्ष दिनेश पवार, उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्याशी संपर्क साधावा.
--------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57205 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top