रत्नागिरी-रत्नागिरीत आज रंगणार मुशायरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीत आज रंगणार मुशायरा
रत्नागिरी-रत्नागिरीत आज रंगणार मुशायरा

रत्नागिरी-रत्नागिरीत आज रंगणार मुशायरा

sakal_logo
By

रत्नागिरीत आज रंगणार मुशायरा

रत्नागिरी, ता. ११ ः महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरीतर्फे गुरुवारी (ता. १२) सायंकाळी ४ वा. जयेश मंगल पार्क येथे अखिल भारतीय कवी संमेलन म्हणजेच ऑल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुशायराचे औचित्य साधून रत्नागिरीतील काही मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. या कवी संमेलनामध्ये उत्तर प्रदेश, तेलंगाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली राज्यातील अनेक मान्यवर व प्रसिद्ध शाहीर म्हणजेच कवी उर्दू आणि हिंदी भाषेमध्ये शायरी सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उद्योजक अण्णा सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरीकरांनी या ऑल इंडिया मुशायरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक अलिमियॉं काझी आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक तांबे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57206 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top