दाभोळ-शिवसंपर्क अभियानाच्या जबाबदारीने कदम समर्थक उत्साहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-शिवसंपर्क अभियानाच्या जबाबदारीने कदम समर्थक उत्साहीत
दाभोळ-शिवसंपर्क अभियानाच्या जबाबदारीने कदम समर्थक उत्साहीत

दाभोळ-शिवसंपर्क अभियानाच्या जबाबदारीने कदम समर्थक उत्साहीत

sakal_logo
By

शिवसंपर्क अभियानाच्या जबाबदारीने
आमदार कदम समर्थक उत्साहीत
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ११ ः दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये २६ ते २९ मे दरम्यान राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आल्याची घोषणा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर यांनी केली. त्यामुळे कदम समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेकांनी सभागृहातच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
शिवसेनेत माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे गट आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सुत्रे दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे दापोलीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते; मात्र नेतृत्वाकडून या अभियानाची जबाबदारी योगेश कदम यांच्यावर देण्यात आल्याची माहिती बोरकर यांनी बैठकीत दिली. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेले दळवी समर्थक काहीसे नाराज झाले, तर कदम समर्थकांमध्ये आपल्याला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. दापोली विधानसभेच्या ग्रामीण भागात आमदार कदम यांच्या समर्थकांची संख्या जास्त असून त्यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसंपर्क अभियान आम्ही यशस्वी करू, अशी ग्वाही माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी दिली आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57207 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top