संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

राजेंद्र हांडे यांची बिनविरोध निवड
दाभोळ ः दापोली तालुक्यात सहकारात अग्रेसर असणाऱ्या जालगाव येथील लोकमान्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजेंद्र हांडे यांची तर मुकुंद तांबे यांची उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. या वेळी माजी अध्यक्ष व संचालक डॉ. प्रसाद करमरकर, शीतल देवरूखकर, नरेंद्र बर्वे, राजन चव्हाण, शेखर कदम, कैलास खरे, मधुरा कांबळे, मयूर मोहिते, सुभाष दाभोळकर, सहाय्यक निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती उपाध्ये, व्यवस्थापक दीपक गोरीवले, माजी संचालिका शोभा दांडेकर, सुमेधा बोडस, अमर भांबीड, संतोष घोसाळकर आदी उपस्थित होते.
--------------
शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराचे वितरण
दाभोळ ः कुणबी सेवासंघ, नवभारत छात्रालय दापोली येथे नवभारत छात्रालयाचे संस्थापक, आद्य संचालक (कै.) पू. सामंत गुरुजी यांचा ५६ वा व संस्थेच्या आर्थिक स्वावलंबनाचे शिल्पकार पू. शिंदे गुरुजी यांच्या १५ व्या स्मृतीमेळाव्याचे आयोजन केले होते. समारंभाला माजी विद्यार्थी व माजी केंद्रीय अवघड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांनी २०२२ हे वर्ष नवभारत छात्रालयालयाचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक रंगनाथ वायंगणकर (आदर्श शाळा, बोरिवली, दापोली), अरविंद सकपाळ (खेर्डी चिंचघरी, चिपळूण), उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक राजेंद्र बांबाडे (न्यू इंग्लिश स्कूल, आंबडस, खेड), उत्कृष्ट शेतकरी अनंत खांबे (मांडकी बुद्रुक, चिपळूण) उत्कृष्ट कृषी उद्योजक स्वप्नाली सावरकर (माभळे, संगमेश्वर), उत्कृष्ट कृषी विस्तार कार्यकर्ता राकेश मर्चंडे यांना अनंत गीते यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पाच हजार रुपये रोख देऊन गौरविले. नवभारत छात्रालयाचे माजी विद्यार्थी तथा माजी आमदार दिगंबर विशे, डॉ. अर्जुन मुरूडकर, माजी सभापती योगिता बांदेर, नगराध्यक्षा ममता मोरे, सदाशिव चव्हाण आदी उपस्थित होते.
-------------
कांगवई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा
दाभोळ ः दापोली तालुक्यातील कांगवई येथे चाळकोबा मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात पंकज बुरटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तिकेचे अनावरण कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव सुनील दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रोहिणी दळवी यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रेश्मा झगडे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रुके, चंद्रकांत साळवी, अनिल पेडणेंकर, महेश पवार उपस्थित होते.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57209 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top