रत्नागिरी ः पालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी
रत्नागिरी ः पालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

रत्नागिरी ः पालिका प्रशासनाकडून मतदान केंद्रांची पाहणी

sakal_logo
By

निवडणूक चिन्ह वापरा
..
पालिका निवडणूक; लोगो
...
गळक्या मतदान केंद्रांची होणार दुरूस्ती

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची प्रशासनाकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणूका पावसाळ्यात होणार की पावसानंतर याबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत; मात्र पालिका प्रशासनाने पावसाळ्यातच निवडणुका होण्याची शक्यता गृहित धरून कामाला सुरवात केली आहे. जिल्ह्यातील ४ पालिकांच्या मतदान केंद्रांच्या स्थितीची पाहणी सुरू झाली आहे. या पाहणीत जी मतदान केंद्र गळतीमुळे पावसाळ्यात धोकादायक ठरणार आहेत, त्यांची दुरुस्ती करून घेण्याचे नियोजन केले जात आहे.
बहुतांश पालिकांच्या शाळाच मतदान केंद्र म्हणून उपयोगात आणली जातात. त्याचबरोबर काही ठिकाणी खासगी शाळांचाही मतदान केंद्र म्हणून वापर केला जातो. रत्नागिरी पालिकेचीही तीच परिस्थिती आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता यतीराज जाधव यांच्यासह जितू विचारे, बंड्या भोंगले, मनिषकुमार बारे आदी अधिकार्‍यांनी रत्नागिरीतील संभाव्य मतदान केंद्रांची पाहणी केली.
पाहणीमध्ये १० ते १५ टक्के शाळा म्हणजेच मतदान केंद्र पावसाळ्यात गळण्याच्या अवस्थेत आहेत. म्हणजेच ८५ ते ९० टक्के मतदान केंद्र मतदान प्रक्रिया पार करून घेण्याच्या सुस्थितीत असल्याचे अभियंता यतीराज जाधव यांनी सांगितले.
..
चौकट
पालिकांनी केली तयारी सुरू..
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरीसह चिपळूण, खेड, राजापूर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यातही अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे रत्नागिरी, खेड, चिपळूण, राजापूर पालिकांनी आपली तयारी सुरू केली आहे. चारही पालिकांच्या प्रशासनाने मतदान केंद्रांची पाहणी सुरू केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57215 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top