मसुरेत कलशारोहणानिमित्त शोभायात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसुरेत कलशारोहणानिमित्त शोभायात्रा
मसुरेत कलशारोहणानिमित्त शोभायात्रा

मसुरेत कलशारोहणानिमित्त शोभायात्रा

sakal_logo
By

21125
मसुरे : श्री भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त काढलेली शोभायात्रा.

मसुरेत कलशारोहणानिमित्त शोभायात्रा

भरतेश्वराचा जयघोष; ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी

मालवण, ता. ११ ः ‘हर हर महादेव... भक्त पायी पायी चाला... मुखाने भरतेश्वर बोला... ग्रामदेवता मसुरे गावा... श्री भरतेश्वर देवा... ओम श्री भरतेश्वराय नमः...’ असा जयघोष करत, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज मसुरेतील श्री भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. श्री पावणाई मंदिर ते भरतेश्वर मंदिरापर्यंत काढलेल्या शोभायात्रेत भगव्या पताका, भगवे वेश व फेटे परिधान करीत महिला-पुरुष सहभागी झाले.
कोकणातील सर्वांत मोठी गावरहाटी कसबा-मसुरे गावचे ग्रामदेवत तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले आहे. या मंदिराचा कलशारोहण सोहळा १० ते १५ मे या कालावधीत होत आहे. यानिमित्त काल (ता. १०) भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. राजस्थान-जोधपूर येथून आणलेल्या मुख्य कलशासह पाच कलशांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. प्रथम श्री देवी पावणाई मंदिर येथे गावराहाटीमधील सर्व देवतांची वारेसूत्र जमल्यावर ढोल-ताशांचा गजर झाला. गावातील शेतमळ्यातून ही मिरवणूक सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरतेश्वर मंदिरात पोहोचली.
या सोहळ्यानिमित्त उद्या (ता.१२) सकाळी साडेसातपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी (ता. १३) सकाळी शांतिपाठ, स्थलशुद्धी, स्थापितदेवता पूजन आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री सव्वानऊला श्री देव भरतेश्वर नाट्यमंडळ, मसुरे देऊळवाडा-मुंबई यांचे यशवंत मानखे लिखित ‘माझे देवा’ नाटक होणार आहे. शनिवारी (ता. १४) रात्री नऊला श्री देव भरतेश्वर नाट्यमंडळाचे बाळ कोल्हटकर लिखित ‘दुरितांचे तिमिर जावो’ नाटक होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57220 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top