कृषी प्रदर्शनाची तारीख निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी प्रदर्शनाची तारीख निश्चित
कृषी प्रदर्शनाची तारीख निश्चित

कृषी प्रदर्शनाची तारीख निश्चित

sakal_logo
By

21128
सिंधुदुर्गनगरी ः पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर. शेजारी इतर.

कृषी प्रदर्शनाची तारीख
निश्चित ः प्रजित नायर

कुडाळात १७ ते २० पर्यंत आयोजन

सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः सिंधु कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. १७ ते २० मे दरम्यान हे प्रदर्शन कुडाळ येथील नवीन बस स्थानक येथे आयोजित केले आहे. यात विविध कृषी पशु विषयक स्टॉल, मार्गदर्शन चर्चासत्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. याचे उद्‍घाटन बुधवारी (ता. १८) राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी ही माहिती दिली.
जिल्हा परिषद सिंधू कृषी व पशुपक्षी प्रदर्शन संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.
नायर म्हणाले, ‘‘सिंधू कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. १७ ला कृषी, पशु, खाद्य, बियाणे, यांत्रिकीकरण आदी प्रकारचे स्टॉल उभारून अनौपचारिक शुभाप्रारंभ केला जाणार आहे. याच दिवशी शोभायात्रा, स्थानिक लोककला होणार आहे. १८ ला बैलगाडी सजावट स्पर्धा, मुख्य उद्‍घाटन सोहळा होणार आहे. दुपारी पशुसंवर्धन चर्चा सत्र, फुगडी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, १९ ला कृषी विषयक चर्चा सत्र (बांबू लागवड, गोड्या पाण्यातील मासे पालन), श्वान स्पर्धा, पाक कृती स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तर २० ला महिला मेळावा व चर्चा सत्र, बक्षीस वितरण व समारोप आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57222 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top