
राऊळ महाराज संतनगरी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात
21127
पिंगुळी ः येथील मठात सुरू असलेला धार्मिक कार्यक्रम.
राऊळ महाराज संतनगरी
धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ
कुडाळ, ता. ११ ः प. पू. अण्णा महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेच्या अनुषंगाने आज संत राऊळ महाराज संतनगरी पिंगुळीत विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.
सकाळच्या सत्रात काकड आरती, धार्मिक कार्यक्रम प्रयाशित्तविधी, महापुरुष विद्या स्तोत्र पठण क्षौर, देवता वंदन, गाऱ्हाणे संकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नादीश्राद्ध, आचार्यवरण, प. पू. राऊळ महाराज सम्प्रोक्षण विधी हवनयुक्त, ब्रह्मस्वरूप प. पू. विनायक (अण्णा) गुरुपादुका व मूर्ती प्रतिष्ठापना संकल्पयुक्त उक्तपुण्याहवचन जलाधिवास, धन्याधिवास, शेय्याधिवास, मंडप प्रतिष्ठा, ब्रम्हादी, अग्नी, मातृका, वास्तू, क्षेत्रपालादी ग्रह स्थापना ग्रहयज्ञ, याचे यजमान शिवराम (अजित) विनायक राऊळ, दुपारी आरती व महाप्रसाद सायंकाळी चारला आबा अण्णा गुरुकाका यांच्या भक्त मंडळीचे ‘अनुभव कथन’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या आयोजिका माया मांजरेकर आणि सूत्रसंचालन आशा गुरव यांनी केले. सायंकाळी साडेसहाला सांज आरती त्यानंतर साडेसातला रामकृष्ण संगीत विद्यालय तेंडोली यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री नऊला विश्वनाथ ऊर्फ भाऊ नाईक, वेतोरे यांचे कीर्तन झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57223 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..