कुडाळात लवकरच सुसज्ज मच्छीमार्केट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात लवकरच सुसज्ज मच्छीमार्केट
कुडाळात लवकरच सुसज्ज मच्छीमार्केट

कुडाळात लवकरच सुसज्ज मच्छीमार्केट

sakal_logo
By

21136
कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार वैभव नाईक. शेजारी अमित सामंत, आफ्रीन करोल, काका कुडाळकर आदी. (छायाचित्र : अजय सावंत)

कुडाळात लवकरच सुसज्ज मच्छीमार्केट

वैभव नाईक ः सर्वांगीण विकासासाठी ‘महाविकास’ कटिबद्ध

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. नगरपंचायतीला पाच कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे. यातील दोन कोटींतून सुसज्ज असे मच्छीमार्केट उभारले जाणार आहे. येत्या काळात शहराच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.
येथील शिवसेना शाखेत महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा सौ. आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, तालुका प्रवक्ते संजय भोगटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, ज्योती जळवी, अक्षता खटावकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.
आमदार म्हणाले, ‘‘कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याने विविध विकासकामांसाठी हा भरीव निधी मंजूर झाला आहे. यात मच्छीमार्केटसाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला असून, शहरात सुसज्ज असे मच्छीमार्केट लवकरच उभारण्यात येणार आहे. नगरपंचायत त्याचे नियोजन करीत असून, विद्यमान मच्छीमार्केट ठिकाणीच सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहे. नगरपंचायचत निवडणुकीवेळी शहरवासीयांना दिलेली आश्वासने पूर्ण केली जाणार आहेत. शहर विकासासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक चांगले काम करत आहेत. भंगसाळ नदी सुशोभीकरणासाठी नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये निधी मंजूर आहे; मात्र याला काहीजण विरोध करत आहे. याकडे लक्ष न देता सुशोभीकरण होणार आहे. पावसाळ्यानंतर हे काम मार्गी लागेल. मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहाचेही अपेक्षित काम केले जाईल.’’
............
चौकट
कुडाळात यंदा कृषी प्रदर्शन
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्यासाठीचा निधी उपलब्ध करू. बसस्थानक आवारातील डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील. जिल्हास्तरीय कृषी पशुपक्षी प्रदर्शन यावर्षी कुडाळात होणार आहे. दोन दिवसांतच यासाठी मंडप उभारणीचा प्रारंभ केला जाईल. १८ ते २० मे दरम्यान, प्रदर्शन होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57233 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top