संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

वाकलेल्या वीजखांबाच्या
जागी उभारला नवीन खांब
खेड ः समर्थनगर येथील नगर पालिका कर्मचारी वसाहत चाळीतील एका घरासह विद्युत खांबावर गत महिन्याच्या अखेरीस कोसळलेले झाड बाजूला हटवून वाकलेल्या वीजखांबाच्या जागी महावितरणकडून नवीन खांब उभारण्यात आला. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वसाहतीतील एका घरावर मोठे झाड कोसळले. यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लगतच असलेला वीज खांबदेखील वाकला गेला होता. झाडाच्या फांद्या व खोड छाटून हटवण्यात आला आहे. वाकलेल्या वीजखांबाच्या जागी महावितरणकडून नवीन वीजखांब उभा करून तेथील रहिवाशांना दिलासा दिला आहे.
----------
माजी विद्यार्थी मंचची सुवर्णसंध्या
मंडणगड ः तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्णसंध्या हा कलाविष्कारांनी नटलेला कार्यक्रम शनिवारी (ता. १४) मे रोजी संध्या. ६ ते ९ या वेळेत रंगणार आहे. एलबीएसएच माजी विद्यार्थी मंचमार्फत आपली शाळा व समाज यांचे काही देणे लागतो, या भावनेतून कार्य सुरू असून शैक्षणिक व समाजोपयोगी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. यावर्षी माजी विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय एकत्रित येत आपल्या शाळेतील गमतीजमती, किस्से, आठवणींना उजाळा देणार असून, सांस्कृतिक कार्यक्रमांतून गीतगायन, नृत्य, विनोदी किस्से, पोवाडे, नाटिका, एकांकिका, कव्वाली, ग्रुपडान्स अशा विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. या वेळी खूप माजी विद्यार्थी एकत्र येणार असून आपली शाळा, विद्यार्थी यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्याचा संकल्प करणार आहेत.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57237 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top