
कुंभवडेत खंडेश्वराचे मिरवणुकीने आगमन
कुंभवडेत खंडेश्वराचे आगमन
आंबोली ः कुंभवडे येथे श्रीदेव श्री खंडेश्वर मूर्तीचे वाजतगाजत मिरवणुकीने आगमन झाले. मंदिर व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात झाली. हा सोहळा तीन दिवस असणार आहे. कुंभवडे (ता. दोडामार्ग, ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ) येथे श्री देव खंडेश्वराची लाकडाची मूर्ती आज आणण्यात आली. या ठिकाणी ग्रामदैवत श्री खंडेश्वर आणि सातेरी भावई तसेच म्हारींगण आणि इतर सर्व देवदेवतांचा पुनःप्राणप्रतिष्ठापना सोहळा आजपासून (ता. ११) सोहळा सुरू झाला आहे. श्री गणेश पूजन, जळीत देव, सुहासिनी गंगापूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पुरोहित, तसेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी चौकुळ, खडपडे, आंबोली, इसापूर शिमधडे तसेच गावातील पै पाहुणे, आजूबाजूच्या गावातील लोक, माहेरवाशिणी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. १३ ला मुख्य कार्यक्रम असून, प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर नारळ ठेवणे, ओठी भरणे आदी कार्यक्रम होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57241 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..