
चिपळूण ः सावर्डेत उड्डाणपूल तर कडवईत रेल्वेस्थानक उभारा
-rat11p24.jpg
21131
- चिपळूण ः कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्तांना निवेदन देताना आमदार निकम.
---------------
सावर्डेत उड्डाणपूल, कडवईत रेल्वेस्थानक उभारा
कोकण रेल्वेचे व्यवस्थापकांना आमदार निकमांचे निवेदन; गुप्तांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः कोकण रेल्वेमार्गावरील सावर्डे येथे प्रवाशांच्या सोयीसाठी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग, संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक उभारल्यास या भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल. त्यासाठी कोकणरेल्वेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण तालुक्यात सावर्डे या मध्यवर्ती ठिकाणी कोकण रेल्वेचे स्थानक असून स्थानकावर एकाच बाजूला प्लॅटफॉर्म आहे. या स्थानकावर खूपवेळा क्रॉसिंगमुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मच्या समोरील बाजूला उतरावे लागते. येथे ओव्हरब्रीज व अंडरपास नसल्याने वयोवृद्ध, महिला व लहान मुले यांना त्याचा खूप त्रास होतो. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या स्थानकावर उड्डाणपूल व भुयारी मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे.
कडवई स्थानकावर स्थानिक रिक्षा व्यावसायिकांसाठी रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करून मिळावी. या मार्गावरून धावणारी सावंतवाडी-दिवा गाडी या गाडीला कडवई रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा म्हणून येथील ग्रामस्थ, प्रवाशी यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे. या स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी व प्रवाशांची अडचण पाहता या गाडीला कडवई रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा. कडवई स्थानकावर प्लॅटफॉर्म नसल्याने अपंग, वयोवृद्ध लहान मुले, आजारी प्रवासी यांना अडचणीचे होत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्लॅटफॉर्म होणे अत्यंत गरजेचे आहे.
---------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57252 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..