रत्नागिरी-मग्रारोहयोची दशवार्षिक योजना आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मग्रारोहयोची दशवार्षिक योजना आराखडा
रत्नागिरी-मग्रारोहयोची दशवार्षिक योजना आराखडा

रत्नागिरी-मग्रारोहयोची दशवार्षिक योजना आराखडा

sakal_logo
By

L21164 ः संग्रहीत
...
मग्रारोहयोसाठी दहा गावांची निवड

दशवार्षिक योजना आराखडा; मागेल त्याला पाहिजे ते काम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (मग्रारोहयो) या योजनेसाठी जिल्ह्यातील दहा गावांची निवड करण्यात आली असून, या योजनेतर्फे मागेल, त्याला पाहिजे ते काम या संकल्पनेवर आधारित दशवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे.
मग्रारोहयोत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार, उपलब्ध संसाधनांचा विचार करून वैयक्तिक लाभाच्या कामांची जोड देत शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी मागेल त्याला पाहिजे ते काम, ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यशिक्षण, पर्यावरण, जल व मृद संसाधारण व पायाभूत सुविधांच्या विकासाशी निगडित कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेत जिल्ह्यातील निवडलेल्या प्रत्येक गावात जाऊन मग्रारोहयोचे पथक स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह तेथील रोजगार सेवकांच्या मदतीने घरोघरी सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये गावातील लोकांच्या गरजा गावात कोणते प्रकल्प राबवता येतील, यांची तपासणी या पथकामार्फत करण्यात येणार आहे. या गावांचा दहा वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गावात पाच कामांची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
..
चौकट
किमान पाच कामे सुरू करा..
मग्रारोहयो योजनेसाठी कोकणातील ५० गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. यामध्ये चिपळूणमधील गांग्रई, दापोलीतील गावतळे, गुहागरातील रानवी, खेडमधील भिलाई आयनी, लांजातील तळवडे, मंडणगडमधील पालघर, राजापुरातील जुवाठी, रत्नागिरीमधील लाजूळ व वळके तर संगमेश्वरमधील सांगवे या गावांचा समावेश आहे. निवडलेल्या गावातील आराखडे तयार करून या गावात किमान पाच कामे सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57257 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top