प्रतिक्रांतीला संघटनातून उत्तर द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिक्रांतीला संघटनातून उत्तर द्या
प्रतिक्रांतीला संघटनातून उत्तर द्या

प्रतिक्रांतीला संघटनातून उत्तर द्या

sakal_logo
By

swt1131.jpg
21154
वैभववाडीः वैभव सन्मान सोहळ्यात बोलताना भीमराव आंबेडकर.

प्रतिक्रांतीला संघटनातून उत्तर द्या
भीमराव आंबडेकर ः वैभववाडीत ''वैभव सन्मान'' कार्यक्रमात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. 11 ः देशातील परिस्थिती धोकादायक आणि गंभीर वळणावर आहे. कोणत्याही क्रांतीनंतर प्रतिक्रांती देखील होते. या प्रतिक्रांतीला उत्तर देण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबडेकर यांनी येथे केले.
तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने धर्मांतरचा हिरक महोत्सव व संस्था रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ''वैभव सन्मान'' कार्यक्रमाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आज तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार श्री. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके, मुख्याधिकारी सूरज कांबळे, यशवंत यादव, माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, माजी अध्यक्ष भिकाजी वर्देकर, ग्रामीण अध्यक्ष भास्कर जाधव आदी उपस्थित होते.
श्री. आंबेडकर म्हणाले, "देशातील परिस्थिती धोकादायक व गंभीर बनली आहे. येणाऱ्या पिढीसाठी चिंता वाढविणारे वातावरण सध्या देशात पाहायला मिळत आहे. धर्मांतराने अमुलाग्र बदल झाला आहे. बौध्द समाजाने शिक्षणाच्या आरक्षणाने उल्लेखनीय प्रगती केली आहे; परंतु ज्या शैक्षणिक आरक्षणामुळे आपली प्रगती झाली, त्याच शिक्षणक्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. ते बहुजन समाजासाठी मारक असून, या संकटाचा सामना सर्वांनी एकत्रित येऊन केला पाहिजे. यासाठी एका मोठ्या बॅनरखाली संघटित होण्याची गरज आहे. तालुका बौध्द सेवा संघाने उभारलेले स्मारक कौतुकास्पद आहे. वास्तूवरून समाजाची ओळख ठरते. या पवित्र वास्तूत धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य होऊ दया. यातून समाज व नवीन पिढी घडेल."
प्रस्तावना सरचिटणीस डॉ. देवेंद्र जाधव, रवींद्र पवार यांनी, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले. आभार मारुती कांबळे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57263 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top