उद्योजक डॉ. परब यांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक डॉ. परब यांनी घेतली
मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट
उद्योजक डॉ. परब यांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट

उद्योजक डॉ. परब यांनी घेतली मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट

sakal_logo
By

L21194
टीपः swt1134.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - मॉरिशस ः पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ यांच्यासोबत डॉ. परब, डॉ. दळवी व अन्य.

उद्योजक डॉ. परब यांनी घेतली
मॉरिशसच्या पंतप्रधानांची भेट
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. 11 ः भारत आणि मॉरिशस देशांतर्गत आयात-निर्यात व्यापाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीणकुमार जगन्नाथ आणि परराष्ट्रमंत्री अलान गनू यांनी कोकण प्रांताच्या कृषी समितीचे माजी अध्यक्ष तथा प्रथितयश उद्योजक डॉ. दीपक परब यांना दिले.
डॉ. परब व शिष्टमंडळ मॉरिशसच्या दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत चर्चा केली. यावेळी मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्सचे मुख्य सचिव युसुफ इस्माईल, कृषी मंत्रालयाचे प्रमुख ओरी गौकरण, माजी पंतप्रधान शीला बापू, प्रमुख व्यावसायिक राज बापू, मॉरिशस मराठी फेडरेशनचे अध्यक्ष आसंद गोविंद आदी उपस्थित होते.
आयात-निर्यात धोरणांतर्गत भाजी, फळे यासारख्या काही गोष्टींवर मॉरिशसकडून निर्बंध असल्याने भारतातील भाजीपाला, फळे तेथे जात नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून मॉरिशसला जास्त व नियमित पुरवठा केला जातो. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रमुख निर्यातदार डॉ. परब यांनी मॉरिशस दौरा केला आणि भारतातील निर्यातदारांना मॉरिशसचे दरवाजे खुले करण्याचा प्रयत्न केला आहे.
मॉरिशस हा देश प्रामुख्याने पर्यटनासाठी परिचित आहे; परंतु या देशाचे उसाचे पीक सोडून इतर उत्पन्न नसल्याने दैनंदिन गरजेपोटी लागणारे अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू इतर देशांकडून आयात केल्या जातात. सर्वच बाबतीत हा देश इतर देशांवर अवलंबून आहे. असे असताना मात्र भारतासारख्या देशाकडून आयातीला प्राधान्य दिले जात नाही, याबाबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक डॉ. परब यांच्यासह निर्यातदार डॉ. दीपक दळवी, राधिका परब, अनुराधा दळवी यांनी नुकताच मॉरिशस दौरा करून सर्व संबंधितांच्या भेटीगाठी घेतल्या. याशिवाय तेथील विविध बाजारपेठा, मॉल्स, शीतगृहे, मुख्य आयातदार यांच्याही भेटी घेतल्या. भारतातून निर्यात करताना जादा भाडे, कर, त्याकरिता लागणाऱ्या सुविधा यासारख्या अनेक अडचणी परराष्ट्रमंत्री ॲलन गनू यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी या समस्या समजून घेऊन तातडीने संबंधितांना सूचना केल्या. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद, मराठी कल्चर सेंटरचे प्रेसिडेंट अर्जुन पुतलाजी, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू, मॉरिशस मराठी मंडळ फेडरेशनचे पीआरओ विस्मा बाबिया यांचीही डॉ. परब आणि सहकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी मॉरिशसचे पंतप्रधान जगन्नाथ भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी केलेल्या आयात-निर्यात धोरणाबाबतच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर डॉ. परब व सहकाऱ्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57320 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top