
मंडणगड ः संभुअण्णांच्या पुण्यतिथीला भेदिकची आदरांजली
-rat12p7.jpg
21248
ः भिलवडी ः सद्गुरू संभुअण्णांच्या पुण्यतिथीला ब्रिदावलीची मिरवणूक काढण्यात आली.
..
-rat12p5.jpg
L21246
ः समाधीस्थळी भेदिक शाहिरी सादर करताना शाहीर.
-------------
संभुअण्णांच्या पुण्यतिथीला भेदिकची शाहिरीची आदरांजली
शाहीर, शिष्यांची उपस्थिती; ब्रिदावलीची मिरवणूक; महोत्सव करण्याचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ः कविवर्य ब्रह्मनिष्ठ सद्गुरु संभाजी अण्णा यांच्या पुण्यतिथीला भेदिक शाहिरीची आदरांजली वाहण्यात आली. संभुराजू परंपरेसह कलगीतुरा पक्षातील मान्यवर शाहिरांची उपस्थिती लक्षणीय ठरली. भिलवडी (ता. पलूस) येथे भक्तिभाव आणि गुरुप्रती असणारी श्रद्धा व्यक्त करून सद्गुरु संभाजी अण्णा यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रम पार पडले.
सकाळी ६ वा. मंदिरात अभिषेक सोहळा झाला. त्यानंतर संध्याकाळी अण्णांच्या मूळ घरापासून ब्रिदावली हे सजवलेल्या बैलगाडीतून शहरातून मिरवणुकीने समाधी स्थळी आणण्यात आले. अण्णांच्या समाधीस्थळाचे रूपडे आता पालटले असून करण्यात आलेली रंगरंगोटी लक्षवेधी ठरली. डफ आणि ढोलकीच्या तालावर शाहिरी बोल घुमले. भेदिक शाहिरीने रात्र जागवण्यात आली. आण्णांचे वंशज कोष्टी कुटुंबीयांनी संपूर्ण नियोजन करत आलेल्या सर्वांचे योग्य आदरातीर्थ केले.
राष्ट्रीय शाहीर देवानंद माळी, बंधुसखा कविवर्य सखाराम खोत, सातप्पा जाधव, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर, निवृत्त पोलिस उपायुक्त रमेश घडवले, वंशज अशोक कोष्टी यांच्यासह सांगली, कोल्हापूर, मंडणगड (रत्नागिरी), सातारा, कराड जिल्ह्यातील नामांकित शाहीर उपस्थित होते. देवानंद माळी यांनी भेदिक शाहिरी वाटचाल आणि कलाकारांच्या अडचणी, समस्या यावर भाष्य करत सर्वांनी एकजुटीने संघटित होऊन कला टिकविण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
------
चौकट
पुढील वर्षी पुण्यतिथीला महोत्सवाचा संकल्प
भेदिक शाहिरी करताना आपल्या प्रकांड पंडित म्हणून बौद्धिकतेची अनुभूती देणारी काव्यरचना करून शाहिरी लोककलेचा वारसा देणाऱ्या संभाजी अण्णा यांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम पुढील वर्षी हा महोत्सव व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना सर्व शाहिरांना या कार्यक्रमाला बोलवताना त्यांच्या प्रवासाची तरतूद करण्याबाबत भिलवडी ग्रामपंचायत विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
...
चौकट
अशोक कोष्टींकडून एक महिन्याची पेन्शन
या पुण्यतिथी कार्यक्रमाला देवानंद माळी यांनी २५ हजार, प्रा. डॉ संपतराव पार्लेकर ५ हजार, मंडणगड शाहिरांच्यावतीने ११ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले. संभुअण्णांचे वंशज अशोक कोष्टी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी आपली एक महिन्याची पेन्शन यासाठी देण्याची घोषणा केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57436 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..