
रक्तदान शिबिराला सोन्सुरेत प्रतिसाद
swt128.jpg
21262
वेंगुर्ले ः येथे रक्तदात्यांना प्रशिस्तपत्र प्रदान करताना वैद्यकिय कर्मचारी.
रक्तदान शिबिराला
सोन्सुरेत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरवली-सोन्सुरे येथे रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. मनसे वेंगुर्ले तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते.
याचे उद्घाटन गोरेगाव मुंबई मनसे शाखा अध्यक्षा उर्मिला नाईक यांच्या शुभहस्ते झाले. श्री गणेशाला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनसे तालुका सचिव आबा चिपकर, सोन्सुरे सरपंच तातोबा कुडव, सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्ला पदाधिकारी व जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, राजन रेडकर, चेतन चव्हाण, तालुका सहखजिनदार भूषण मांजरेकर, सदस्य सनी रेडकर, सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. आकाश हेडगे, डॉ. अनिल खाडे, डॉ. मानसी बागेवाडी आदी नवनिर्माण सेना कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात येथील ब्लड बँकेचे प्रकाश सातार्डेकर आणि त्यांचे सहकारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मनसे तालुकासचिव आबा चिपकर, सावंतवाडी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, आनंद आमरे, ओंकार चिपकर, श्रेयस केरकर आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57440 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..