
वंचित बहुजन ताकदीने लढणार
वंचित बहुजन ताकदीने लढणार
प्रदीप कांबळे ः सावंतवाडीत रक्तदान शिबीराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः येथील पालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने लढत देणार आहे. ओबीसी बांधवांना जास्त जास्त उमेदवारी देऊ तसेच महिला आणि सुशिक्षित युवावर्गालाही संधी दिली जाईल, असे प्रतिपादन शहराध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी केले. ते रक्तदान शिबिराच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष विजय शेर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, कोकण प्रदेश सदस्य संजय जाधव, जिल्हा कार्यालयीन सचिव संदीप जाधव, तालुका महिला आघाडी प्रमुख मानसी सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष ताणू निकम, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम, कुडाळ तालुका युवक अध्यक्ष भिकाजी जाधव, माजी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, माजी सचिव मिलिंद नेमळेकर, मळगाव शाखा अध्यक्ष विकास जाधव, सामाजिक कार्यकर्ते आदेश जाधव, कृष्णा तुळसकर, प्रशांत पाटणकर, मुकेश कांबळे, हेमंत कांबळे, अनिकेत जाधव, यशवंत देसाई आदी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १ ते १० मे या कालावधीत सप्ताह साजरा करण्यात आला. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रक्तदान शिबिर व सभासद मोहिमेचा कार्यक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन पक्षाचे निरीक्षक संतोष खोपकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रम अध्यक्षस्थानी शहर महिला आघाडी प्रमुख उजमा शेख होत्या. यावेळी जिल्हा निरीक्षक यांच्या उपस्थितीत येथील पालिकेच्या पहिल्या महिला उमेदवार शेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57441 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..