
कोलगाव सोसायटी चेअरमनपदी वीरेंद्र धुरी
कोलगाव सोसायटी
चेअरमनपदी वीरेंद्र धुरी
सावंतवाडी, ता. १२ ः कोलगाव सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाचे वीरेंद्र धुरी, तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेचे थॉमस डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांच्या खास बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून श्रीम. यादव उपस्थित होत्या. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. यात भाजपाचे आठ, तर शिवसेनेचे पाच संचालक आहेत. त्यानंतर आज ही निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक जयानंद म्हापसेकर, लक्ष्मण राऊळ, प्रभाकर राऊळ, रवींद्रनाथ राऊळ, महेश सारंग, सलमा शेख, धाकू पाटील, बाबुराव चव्हाण, मेघःश्याम काजरेकर, पुंडलिक राऊळ, शुभांगी घोगळे उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन श्री. धुरी आणि व्हाईस चेअरमन श्री. डिसोजा यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध कृषी व फलोत्पादन योजनांचा लाभ गावातील शेतकरी व लघू उद्योजकांना देण्यात येणार असून, महिला वर्गालाही रोजगारासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी चेअरमन चंदन धुरी, माजी सरपंच संदीप हळदणकर, बळवंत कुडतरकर, माजी उपसरपंच पप्पू ठिकार, सुरेश दळवी, सोसायटीचे सचिव रामा म्हैसकर आदींनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57442 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..