
आदित्य कविटकर कॅरम स्पर्धेत अजिंक्य
L२१२५६
- कणकवली ः कॅरम स्पर्धेतील विजेता आदित्य कविटकर याला पारितोषिक देताना मान्यवर.
आदित्य कविटकर कॅरम स्पर्धेत अजिंक्य
कणकवलीतील स्पर्धा ः १८ वर्षांखालील वयोगटातून मिळविले यश
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १२ ः सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने कणकवली तालुका कॅरम असोसिएशन आयोजित (कै.) चंद्रकांत विठ्ठल नाईक स्मृतीचषक कनिष्ठ गट जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२२-२३ नुकतीच अंकुरम प्री स्कूल, कणकवली येथे पार पडली. या स्पर्धेतील १८ वर्षे वयोगटाखालील मुलांमध्ये सावंतवाडी-ओटवणे येथील आदित्य कविटकर याने अजिंक्यपद् पटकावले.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रायोजक हेमंत नाईक, कॅरमचा विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कणकवली तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. अमोल खानोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. यानंतर विश्वविजेत्या प्रशांत मोरेने आपल्या संबोधनात जिल्ह्यातील युवा खेळाडूंना कॅरम प्रॅक्टीस, प्रत्यक्ष मॅच खेळताना आणि यशस्वी झाल्यानंतर यश टिकविण्यासाठी काय करायचे, याबाबतचे मार्गदर्शन केले. श्री. नाईक तसेच श्री. बेलवलकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले. पारितोषिक वितरण सोहळ्याला हेमंत नाईक, असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अवधूत भणगे, खजिनदार शुक्राचार्य म्हाडेश्वर, सदस्य पांडुरंग पाताडे, अनिल कम्मार तसेच कणकवली तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष खानोलकर उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः १२ वर्षांखालील मुली-दिव्या राणे, दिव्या चव्हाण, मीरा आपटे (तीनही कणकवली). १२ वर्षांखालील मुले-वेदस्य राणे, पियुष चव्हाण, चिनार राणे (तीनही कणकवली), १४ वर्षांखालील मुली-मैत्रेयी आपटे (कणकवली), १४ वर्षांखालील मुले- अमूल्य घाडी, भूषण मडगावकर (दोन्ही सावंतवाडी), १८ वर्षांखालील मुली-दीक्षा चव्हाण (कणकवली, मयुरी गावडे (सावंतवाडी), केशर निर्गुण (सावंतवाडी). १८ वर्षांखालील मुले-आदित्य कविटकर (सावंतवाडी), नेविस डान्टस (कुडाळ), मयुरेश नाईक (सावंतवाडी).
..................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57443 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..