''स्वच्छग्राम समितीकडून निरवडे गावाची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''स्वच्छग्राम समितीकडून 
निरवडे गावाची पाहणी
''स्वच्छग्राम समितीकडून निरवडे गावाची पाहणी

''स्वच्छग्राम समितीकडून निरवडे गावाची पाहणी

sakal_logo
By

swt121.jpg
L21255
निरवडे ः संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मूल्यांकन समितीचे स्वागत करताना सरपंच हरी वारंग व मान्यवर.

स्वच्छग्राम समितीकडून
निरवडे गावाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम मूल्यांकन समितीतर्फे निरवडे गावात पाहणी करून गावातील ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. या समितीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विनायक ठाकूर यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी निरवडे ग्रामपंचायतीचा कारभार, व्यवस्थापन तसेच गावातील स्वच्छता व विकासकार्याबाबत समाधान व्यक्त केले.
सावंतवाडी गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रज्ञा सावंत, स्वच्छता मिशनचे अविनाश सावंत, जिल्हा परिषद ग्राम विस्तार अधिकारी शिंगाडे, पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. धर्णे आदींनी या पाहणीत सहभाग घेतला. त्यांना निरवडे सरपंच हरी वारंग, उपसरपंच चंद्रकांत गावडे, माजी सरपंच सदा गावडे, माजी सरपंच प्रमोद गावडे व विस्तार अधिकारी मधुकर घाडी तसेच स्वच्छता समिती उपाध्यक्ष संतोष गावडे यांनी निरवडे गावाच्या जडणघडण, कारभार तसेच कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. उपस्थित पाहणी अधिकाऱ्यांनी निरवडे ग्रामपंचायत व गावातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. या पाहणी व ग्रामपंचायत भेटी वेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबल सावळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57444 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top