सेवाकाळातील स्मृतींची निवृत्तीनंतरही सोबत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवाकाळातील स्मृतींची निवृत्तीनंतरही सोबत
सेवाकाळातील स्मृतींची निवृत्तीनंतरही सोबत

सेवाकाळातील स्मृतींची निवृत्तीनंतरही सोबत

sakal_logo
By

swt126.jpg
21260
कुडाळः महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या स्नेहमेळाव्याचे उद्धाटन करताना मनोहर आंबेकर व मान्यवर.

सेवाकाळातील स्मृतींची निवृत्तीनंतरही सोबत
शरद कांबळी ः कुडाळात ''महसूल''मधील निवृत्तांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः आयुष्यातील तीस-पस्तीस वर्षे महसूल खात्यातील सेवेत गेली. या सेवा काळात अनेक सहकारी मिळाले. सर्वांशी मैत्रीचे सूर जुळले. चांगले वाईट अनुभव आले; परंतु मनात कोणतीही कटूता न ठेवता स्नेहबंध कायम राहिले. सेवानिवृत्तीनंतरही या आठवणी सोबत राहिल्या. या आठवणींना प्रत्यक्ष भेटीत उजाळा देता यावा, यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित केला आहे, असे प्रतिपादन स्नेहमेळाव्याचे निमंत्रक व समिती सदस्य शरद कांबळी यांनी केले.
महसूल खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा स्नेहमेळावा येथील मराठा हॉलमध्ये नुकताच झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकारी रमाकांत धर्णे होते. याप्रसंगी २०१६ नंतर जे सहकारी दिवंगत झाले, त्यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्तांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना शुभदा सामंत यांनी सेवा काळातील आठवणी सांगितल्या. सेवानिवृत्त तहसीलदार सुरेश राऊळ यांनी आपली प्रकृती ठीक नसतानाही आपण देशभरात कुठे कुठे फिरलो, याचे खुमासदार वर्णन केले. मेळाव्याच्या निमित्ताने आपण एकत्र येऊ शकलो. त्यामुळे असे मेळावे दरवर्षी आयोजित केले जावेत, अशी सूचना सेवानिवृत्त तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर यांनी आपल्या भाषणात केली. जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर आंबेकर यांनी संघटनेचे सभासद होण्याबद्दल आवाहन केले. याप्रसंगी पी. व्ही. ठाकूर, वसंतराव बिबवणेकर, सुप्रिया बागायतकर यांनीही आपले विचार मांडले. अध्यक्ष रमाकांत धर्णे यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन चांगल्याप्रकारे केल्याबद्दल आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद वळंजू व सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद वळंजू यांनी केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी शरद चिपकर, विलास मोरजकर, तारककुमार मठकर, विनायक मयेकर, सुरेश नाईक, विनोद मांजरेकर, रश्मी मठकर, सुहास देवळेकर इत्यादींनी सहकार्य केले. सहा वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या स्नेहमेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57446 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top