
कुडाळ मेकॅनिक असोसिएशनचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात
L२१२६१
पिंगुळी : टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचा वार्षिक स्नेहमेळावाप्रसंगी उपस्थित मान्यवर व पदाधिकारी.
कुडाळ मेकॅनिक असोसिएशनचा
वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः येथील तालुका टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचा वार्षिक स्नेहमेळावा भवानी मंगल कार्यालय काळेपाणी, पिंगुळी येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन सहाय्यक निरीक्षक अरूण पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मोटर वाहन सहाय्यक निरीक्षक प्रविण सातारे, प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र कर्जदार जमीनदार, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रसाद करंदीकर, संघटनेचे अध्यक्ष संदिप तेंडोलकर, माजी अध्यक्ष आनंद पेडणेकर, उपाध्यक्ष वैभव सुतार, सेक्रेटरी गुरूनाथ धुरी, खजिनदार दिपक रांजणकर, कुडाळ शहर प्रमुख दिवाकर मांजरेकर, शहर उपप्रमुख प्रकाश सातार्डेकर, सह खजिनदार मोहित मेथर, प्रमुख सल्लागार बबलू पिंगुळकर, सल्लागार संदेश गावकर, रियास शेख, सह सचिव नित्यानंद परब यांच्यासह असो. कार्यकारीणी पदाधिकारी, सदस्य व सर्व सल्लागार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. असोसिएशनचे सेक्रेटरी गुरूनाथ धुरी यांनी प्रस्तावना केली. प्रमुख वक्ते अॅड. करंदीकर यांनी संघटना मजबुत बनविण्यासाठी प्रत्येक सभासदांनी काय करावे, कोणकोणते बदल करणे गरजेचे आहेत, यावर मार्गदर्शन केले. व्यवसायात येणार्या समस्यांवर काय उपाययोजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मोटर वाहन सहाय्यक निरीक्षक पाटील यांनी वाहतुक व स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले तर श्री. सातारे यांनी रस्ता सुरक्षा वाहतुक व सरंक्षण याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन राजा सामंत यांनी केले तर आभार दिपक रांजणकर यांनी मानले.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57447 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..