कृषी प्रदर्शनाचे कुडाळात भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी प्रदर्शनाचे
कुडाळात भूमिपूजन
कृषी प्रदर्शनाचे कुडाळात भूमिपूजन

कृषी प्रदर्शनाचे कुडाळात भूमिपूजन

sakal_logo
By

L२१२५८

ओळ - कुडाळ ः येथे कृषी प्रदर्शनाचे भूमिपूजन प्रजित नायर यांच्या हस्ते वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले. (छायाचित्र ः अजय सावंत)

कृषी प्रदर्शनाचे
कुडाळात भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः येथील नवीन एसटी स्टँडच्या बाजूच्या मैदानावर १७ ते १९ मे या कालावधीत कृषी प्रदर्शन होणार आहे. आज सकाळी याचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कुडाळचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, रुपेश पावसकर, राजू गवंडे, संजय भोगटे, राणे, संदीप म्हाडेश्वर, विद्यानंद आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी प्रदर्शनाच्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी आमदार नाईक यांनी, या भव्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनास राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कृषी प्रदर्शनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदाच होईल, असे सांगितले.
---------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57449 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top