रत्नागिरी- सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सदर
रत्नागिरी- सदर

रत्नागिरी- सदर

sakal_logo
By

छोटो फोटो २९ एप्रिल टु ४ वर लावला आहे
...
rat12p13.jpg
21267
प्रा. डॉ. केतन चौधरी
.........
मत्स्यपुराण - लोगो
.........
मासेमारीतील समस्या- मुक्तीकरिता शाश्वत मासेमारी

- भाग 2
इंट्रो

मासेमारीच्या समस्यांमध्ये वाढ होण्यास काही प्रमाणात मासे खाणाऱ्या जनतेचाही सहभाग आहे. अंडीधारी मासे - कोळंबी - खेकडे जिभेचे लाड पुरवण्याकरिता कितीही चांगले असले तरी समुद्र अथवा खाडीच्या परिसंस्थेकरिता अत्यंत घातक आहे. सर्वांनी जाणीवपूर्वक ते टाळले पाहिजे. अंडीधारी मासे, अपरिपक्व मासे खाणे टाळल्यामुळे मागणी कमी होते.
- प्रा. डॉ. केतन चौधरी

मासेमारीवर त्यामुळे ‘मासेमारीचा ताण’ येत नाही. मासेमारीला बंदी असते त्या वेळी साहजिकच खाणाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने मासे खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. खाणाऱ्यांची संख्या वाढली पण निसर्गाला ओरबाडून जर आपण खात राहिलो तर निसर्ग ते खाणे देणेच बंद करेल. त्यामुळे निसर्ग-परिसंस्था-पर्यावरण जपले पाहिजे ते याकरिता. हाच निसर्ग - परिसंस्था - पर्यावरण आपणास पिढ्यानपिढ्या पोषण करत आलेला आहे. भविष्यातील अगणित पिढ्यांच्या पोषणाची जबाबदारी त्यावर आहे. त्याप्रमाणे निसर्गाचे काम सुरू असते; पण मानव त्यात विज्ञान - तंत्रज्ञान - प्रगती या नावाखाली अडथळे निर्माण करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा योग्य आणि नियंत्रित वापर करणे आवश्यक आहे उदा. उपग्रहाद्वारे छायाचित्रे घेऊन, पाण्यातील हरितकण आणि पाण्याचे तापमान यांच्या आधारावर समुद्रात मासे कोठे मिळतील, त्या जागा मच्छीमारांना कळवण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या फोरकास्टची यशार्थाता सुमारे सत्तर टक्केपर्यंत आहे, असे संशोधक दावा करतात.
मासेमारांना याचा प्रत्यय येत आहे. मूळ मुद्दा असा आहे, मासळी मिळण्याचा फोरकास्ट देताना लहान मासे किंवा अंडीधारी मादी मासे पकडले जाणार नाहीत याची कोणतीही काळजी न घेतल्यास असा फोरकास्ट प्रत्यक्षात शाश्वत मासळी उत्पादनाच्या विरोधात काम करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाश्वत मासेमारीकडे जाण्याऐवजी आपण मासेमारीतील समस्यांमध्ये वाढ करत आहोत, हे निदर्शनास येते. या परंपरागत व्यवसायात आज केवळ, कोळी, खारवी, भोई नसून इतर लोकही या व्यवसायात ''पैसा आहे'' म्हणून उतरलेले आहेत. पारंपरिक व्यवसायात अनुभवाच्या आधारावर काही नियम सांगितलेले असतात. पण आजकाल आपण नियम सोयीस्कर असेल तरच पाळतो. आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे परंपरागत चालत आलेले ज्ञान चुकीचे असावे, अशी कोणतेही कारणमीमांसा न करता आपण नाकारतो. उदा. पारंपरिक ज्ञानातून असे कळते की, देवशयनी एकादशीपासून ते देव - उठी एकादशी या कालावधीत पूर्वी मासेमारी बंद असे. या कालावधीस चातुर्मास असे म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या पाण्यात प्रवेशालाच बंदी होती. मासेमारी तर दूरच लोकांना ते सोप्या भाषेत समजावून सांगण्याकरिता ‘देव पाण्यात झोपतो म्हणून पाण्यात जाण्यास बंदी’, असे सांगण्यात आले. हा बंदीचा कालावधी सुमारे चार महिन्यांचा असतो. पूर्वापार चालत आलेले हे पारंपरिक ज्ञान सोयीस्कररित्या कमी करत आम्ही सात दिवसापर्यंत आणले आहे. साहजिकच या चार महिन्याचे मासोळी निर्मितीचे सर्जनशीलतचे कार्य समुद्रात-पाण्यात निसर्गाकडून चालत असे ते आता केवळ सात दिवस प्रत्यक्षात पाळण्यात येते. सांगायचा मुद्दा हा की, पूर्वी संस्कृती ही बाब सांगत असे. आता तीच बाब थोडी वेगळ्या पद्धतीने शास्त्र सांगते आहे; पण शास्त्र आणि संस्कृती या दोन्ही बाबी सोयीस्कर नसल्याने त्या आपण सर्व मासे मारणारे आणि मासे खाणारे मानत नाही. त्यामुळे मासेमारीतील समस्यांमध्ये वाढ होत आहे.
मासे बाजारात तर महाग असतात मग मच्छीमाराला त्यापासून फायदा का होत नाही? त्याचा दोष आपण परत एकदा सोयीस्कररित्या पणनसाखळीतील मध्यस्थावर फोडतो; पण केवळ दोष देऊन चालेल काय? त्यावर उपाय काय? तर सहकारी तत्त्वावर मासळी खरेदी-विक्री, प्रक्रिया-निर्यात करणे, हा सर्वात सोपा उपाय. तो आम्हाला माहीत नाही का? माहित आहे. कारण त्याकरिता तर आपण मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था निर्माण केल्या आहेत. मग या संस्था हे कार्य का करत नाहीत? सक्षम मनुष्यबळ नसल्याने केवळ सोपे आणि सुटसुटीत मार्ग आपण अंगीकारतो त्यामुळे मूळ समस्या सुटत नाही.
प्रदूषण ही तर सार्वत्रिक समस्या होत आहे. वाढत्या प्रदुषणाचा सर्वात मोठा फटका नद्या, खाडी क्षेत्र आणि समुद्राला होत आहे. आधुनिक नागरी वस्त्यांमध्ये निर्माण होणारा सर्व कचरा, सांडपाणी, कारखान्याचे सांडपाणी समुद्राकडे नद्या आणि खाडीमधून मार्गस्थ होतो. या तीनही परिसंस्था त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषित असल्याचे दिसून येते. प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा प्रत्येक राज्यात आणि केंद्रात सुद्धा आहे. ही यंत्रणा जेवढी प्रभावीपणे कार्य करेल तेवढे प्रदूषण नियंत्रित होऊन मासेमारीकरिता पोषक वातावरण तयार होईल. असे पोषक वातावरण तयार होण्याकरिता मच्छीमारांच्या सामाजिक संस्थामार्फत प्रदूषण नियंत्रणाच्या कामात स्वयंस्फूर्तीने सहभाग आवश्यक झाला आहे. जलस्रोतांच्या प्रदूषणामुळे मासळीचे रहिवासाची ठिकाणे नष्ट होत आहेत.
(लेखक मत्स्य संपत्ती अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षण विभाग मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57451 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top