संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

दापोलीत ५० चालकांवर कारवाई
दाभोळ ः वाहतूकदिनानिमित्त दापोली शहरात पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकीवरून ट्रीपल सीट जाणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, विनापरवाना वाहन चालावणाऱ्या ५० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून २२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत हेडकॉन्स्टेबल देवानंद बोरकर, भूषण सावंत, मोहन देसाई, धनाजी देवकुळे यांचेसह होमगार्डचे जवान सहभागी झाले होते.
----------
दापोलीत उदबोधन वर्गाचे उदघाटन
दाभोळ ः दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रम्य संस्कृतम् भाषा उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश जोशी यांनी केले. संस्कृत भाषा संस्कृतीचे जतन करणारी असून त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी व भाषेचे जतन व्हावे, या हेतूने या उद्बोधनवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गामधून संस्कृत भाषा अतिशय सोप्या पद्धतीने कशी वापरता येईल, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून गाणी, गोष्टी, खेळ, लघुचित्रपट यातून व्याकरण, दैनंदिन जीवनात वापरात येणारी भाषा यांचा अभ्यास केला. आपण समजत होतो, त्यापेक्षा संस्कृत भाषा अतिशय सोपी आहे, असे मनोगत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. समारोपाला मुकेश बामणे यांनी संस्कृत भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. संस्था संचालक सौरभ बोडस यांनी नवीन शालेय धोरणातील संस्कृत भाषेचे स्थान आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या भाषाक्षेत्रातील संधींची सखोल माहिती दिली.
--------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57453 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top