
राजापूर-राजापूर शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करा
-rat12p8.jpg
21241
ः राजापूर ः शहर विकासकामांसंबंधी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याशी चर्चा करताना माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, नाना कुवेसकर आदी.
----------------
राजापूर शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करा
माजी नगराध्यक्ष खलिफेंची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः शहरातील मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज मार्गासह अन्य प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावीत. शहरातील गटारांच्या साफसफाईची कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्याधिकारी भोसले यांची भेटही घेत शहरातील विकासकामासंबंधी चर्चा केली.
शहरातील महत्वपूर्ण अशा जवाहरचौक ते तालीमखाना, छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गाचे काँकिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी अद्याप गटारांवरील चेंबर बंदिस्त करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, राजापूर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याला जोडणाऱ्या बाजारपेठेतील अन्य जोडरस्त्यांची कामेही पूर्ण करावीत, अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे. या वेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, नाना कुवेसकर आदी उपस्थित होते.
..
चौकट
सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करा
तालीमखाना ते जवाहर चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रलंबित असून, पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लागावे तसेच उर्वरित प्रलंबित सर्व कामे मार्गी लावावीत, अशी मागणी अॅड. खलिफे यांनी केली आहे. शहरवासियांना सुरळीत व नियमित पाणीपुरवठा व्हावा, या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे त्यांनी मुख्याधिकारी भोसले यांना सुचवले. शहरातील स्ट्रीटलाईट सुरळीत करावी, पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व गटारांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणीही अॅड. खलिफे यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57454 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..