
रत्नागिरी ः शैक्षणिक चळवळीनेच समाज निर्मितीचे कार्य
rat11p15.jpg
L21071
- रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात आयोजित समता साप्ताहा निमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्रा. तुळशीदास रोकडे.
----------
..तरच भारत खऱ्या अर्थाने
स्वावलंबी बनेलः रोकडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः मानवी मूल्ये स्वीकारलेल्या स्वाभिमानी समाज निर्मितीचे कार्य शैक्षणिक चळवळीने पार पाडावे, ही डॉ. आंबेडकरांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर आहे. तसे झाले तर भारत खऱ्या अर्थाने साक्षर आणि स्वावलंबी बनेल, असा विश्वास प्रा. तुळशीदास रोकडे यांनी व्यक्त केला.
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने आयोजित केलेल्या समता साप्ताह निमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. रोकडे बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक चिंतन मूलगामी स्वरूपाचे असून अज्ञानामुळे व्यक्तीचे तर नुकसान होतेच. त्याचबरोबर समाजाचेही नुकसान होते. यातून बाहेर पडण्याचा मार्ग शिक्षण असून त्यासाठी संविधानात्मक तरतुदीच्या सुयोग्य अंमलबजावणीची आवश्यकता आहे.
उपकेंद्राचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी वर्तमान शिक्षणाचा आढावा घेत असताना मुंबई विद्यापीठ त्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. विविध अभ्यासक्रमाच्या निर्मितीतून आणि अंमलबजावणीतून उपकेंद्र डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत शिक्षणाचा प्रसार कशा पद्धतीने करू पाहते, याचीही चर्चा केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57455 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..