चिपळूण ः उमरोलीत मोफत दंत तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः उमरोलीत मोफत दंत तपासणी
चिपळूण ः उमरोलीत मोफत दंत तपासणी

चिपळूण ः उमरोलीत मोफत दंत तपासणी

sakal_logo
By

उमरोलीत उद्या मोफत दंत तपासणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः तालुक्यातील उमरोली चिवेलीफाटा येथे नव्याने झालेल्या डॉ. अमृत कांबळे यांच्या अमृत क्लिनिकच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंततपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये उपलब्ध सुविधा म्हणजे दंत क्ष-किरण, रुटकॅनल ट्रीटमेंट, कृत्रिम कवळी बसवणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, डेंटल इम्प्लांट बसवणे, अक्कलदाढेवरील शस्त्रक्रिया, बालदंतरोग उपचार, दातांवर मेटल/सिरॅमिक कॅप बसवणे, सुटलेल्या/किडलेल्या दातांना पूर्ववत करणे, अत्यानुधिक निर्जंतुकीकरण सुविधा, नैसर्गिक दात वाचवण्यावर अधिकतम भर, अल्ट्रासॉनिक मशिनद्वारे दात साफ करणे, मौखिक आरोग्य जपण्याविषयी समुपदेशन करणे अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रामपूर-मार्गताम्हाणेसारख्या ग्रामीण भागात विविध आजारांवरील दवाखाने व डॉक्टर आहेत; मात्र दंत आजारावरील सेवा देणारे एकही रुग्णालय किंवा क्लिनिकसुद्धा नाही. या भागातील रुग्णांना चिपळूण येथेच जावे लागत असे; मात्र, आता ही गैरसोय टळली आहे. या शिबिराचा या परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अमृत कांबळे यांनी केले आहे.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57456 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top