राजापूर-प्रभागरचना कार्यक्रम जाहीर, पण निवडणुकीबाबत संभ्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-प्रभागरचना कार्यक्रम जाहीर, पण निवडणुकीबाबत संभ्रम
राजापूर-प्रभागरचना कार्यक्रम जाहीर, पण निवडणुकीबाबत संभ्रम

राजापूर-प्रभागरचना कार्यक्रम जाहीर, पण निवडणुकीबाबत संभ्रम

sakal_logo
By

-rat12p4.jpg
L21245
राजापूर नगर पालिका
-------------
प्रभागरचना कार्यक्रम जाहीर, पण निवडणूक कधी?

राजापूर पालिका; पावसाळ्यापूर्वी की नंतर ?, इच्छुकांची सावध भूमिका
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः राज्य शासनाने नगर पालिकांच्या प्रभागरचनेचा अधिकार आपल्याकडे घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेला प्रभागरचनेचा कार्यक्रम स्थगित झाला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करत निवडणूक आयोगाने पुन्हा प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी निवडणुका लागलीच जुलैमध्ये घेणार की, पावसाळ्यानंतर होणार, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. त्यामुळे इच्छुकांकडून निवडणुकीचा अंदाज घेऊन मोर्चेबांधणीच्या अनुषंगाने सावध पावले टाकली जात आहेत.
सदस्यसंख्या निश्‍चिती आणि त्यानंतर ओबीसी आरक्षण या सार्‍यांमुळे पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या; मात्र, निवडणुका घेण्याच्या अनुंषगाने प्रशासकीय स्तरावर हालचालींना सुरवात होताना निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत, या भूमिकेवर राज्यातील महाविकास आघाडी ठाम राहिली. ओबीसी आरक्षणात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशा स्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नव्याने प्रभागरचनेचे कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आता निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामध्ये जाहीर झालेली प्रभागरचना ज्या ठिकाणी थांबली, तेथून पुढे प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती दाखल करण्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे इच्छुकांकडून नव्या दमाने निवडणूक पूर्वतयारी आणि मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. अद्यापही प्रत्यक्षात निवडणुका कधी होणार, हे अनिश्‍चित आहे. त्यामुळे इच्छुकांकडूनही जोपर्यंत प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार नाही, तोपर्यंत काहीशी सावध पावले टाकली जात आहेत.
-------------
चौकट
असा आहे प्रभागरचना कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, जाहीर केलेल्या प्रभागरचनेवर येत्या शनिवारी (ता.१४) पर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत. २३ मे पर्यंत हरकतींवर सुनावणी होईल.३० मे पर्यंत हरकतींवरील अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्‍यांचा अहवाल जाईल. त्यानंतर, ६ जूनला प्रभागांना अंतिम मान्यता मिळेल.
..

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57460 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top