मडणगड - नवरंगाच्या सुरावटी अन् पिल्लांचा जन्मोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडणगड - नवरंगाच्या सुरावटी अन् पिल्लांचा जन्मोत्सव
मडणगड - नवरंगाच्या सुरावटी अन् पिल्लांचा जन्मोत्सव

मडणगड - नवरंगाच्या सुरावटी अन् पिल्लांचा जन्मोत्सव

sakal_logo
By

काही सुखदः लोगो
....
-rat12p9.jpg
21253
ः मंडणगड ः नवरंग पक्षाने बांधलेले घरटे आणि नवरंगाच्या घरट्यातून बाहेर आलेली इवलीशी पिल्ले.
--------------
नवरंगाने थाटले संसार; निसर्ग बनला पक्ष्यांसाठी तारणहार

नवरंगाच्या सुरावटी अन् पिल्लांचा जन्मोत्सव; पक्षांचा किलबिलाट; झाडाझुडपांत घरटी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ः मे महिन्याचा प्रचंड उकाडा सुरू असताना दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील निसर्गाचे सौंदर्य खुलते आहे. पक्षी ही त्याचा अविभाज्य भाग असून, यामध्ये झाडांवर सावलीत विविध पक्ष्यांनी आपले संसार थाटले आहेत. त्या घरट्यातून पिल्लांचा जन्मोत्सव सुरू झाला आहे. झाडाझुडपातून दुर्मिळ नवरंग पक्षी सुमधूर सुरावटी आळवत असून पावसाचे संकेत देत आहे.
जून महिन्यात मान्सून पावसाचे आगमन होत असल्याने निसर्गात नवजात पिल्लांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध होते. पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यान, अनेक पक्ष्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. हा पक्ष्यांचा विणीचा काळ असतो; मात्र पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेकवेळा नैसर्गिक, मानवी घटनेची शिकार होतात. शेताच्या बांधालगत, झाडाच्या पानात, काटेरी झुडपात, झाडाझुडपांवर आपले संसार उभे केले असून, सभोवतालच्या परिसरात ते मनसोक्त बागडताना दिसून येत आहेत. सध्या त्यांचा विणीचा काळ सुरू असून, काही घरट्यांतून अंडी तर काहीतून चिमुकली पिल्ले दिसून येत आहेत. पिल्लं आढळणारी घरटी ही बुलबूल, वटवट्या, हळद्या, चिमणी, खंड्या म्हणजेच धीवर पक्षांची आहेत. तसेच कृष्ण थिरथीरा, भारीट, खंड्या, भुरळी, हळद्या, मोर, चष्मेवाला, दुर्लव असे अनेक पक्षी दृष्टीस पडत असून, परिसरात त्यांचा आवाज कानी पडतो. विविध प्रकारचे कीटक, किडे, मुंग्या पकडून आपल्या पिल्लांच्या चोचीत भरवताना त्यांचे कसब पाहणे अवर्णनीय असते.
...
चौकट
भरारी घेणाऱ्या पक्षांची संख्या कमी..
पक्ष्यांनी बनवलेली घरटी अनेकवेळा कोणत्यातरी घटनेची शिकार होतात. अन्य वन्यप्राणी, मोठे पक्षी यांच्याकडून घरट्यातील अंडी, पिल्ले खाण्याच्या घटना घडतात. वादळी वाऱ्यामुळे घरटी कोसळतात. त्यामुळे घरट्यातून यशस्वी भरारी घेणाऱ्या पक्षांची संख्या खूपच कमी आहे.
-------------
चौकट
अधिवास धोक्यात
जंगलतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येवर विपरित परिणाम जाणवू लागला आहे. पक्षी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्थलांतर साधत असतात. घरटी बांधण्यासाठी सुरक्षित झाडे तोडीमुळे नष्ट करण्यात येत आहेत. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे त्यांच्या अधिवासावर दिवसेंदिवस गंडांतर आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57461 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top