रत्नागिरी- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त
रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

sakal_logo
By

-rat12p12.jpg
21252
- रत्नागिरी : आगाशे विद्यामंदिरात चित्रकला शिबिरात बालदोस्तांना मार्गदर्शन करताना चित्रकार कविता बंकापुरे.
--------------
चित्रकला शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी ः येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या सभागृहात कलात्मक व सृजनात्मक गुण वाढीस लागण्याच्या उद्देशाने चित्रकला शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये वयवर्ष ५ ते १४ या वयोगटातील ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कोल्हापूरमधील चित्रकार कविता बंकापुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये अक्षरांपासून चित्र, वारली चित्र, कागदाच्या पपेट्स, माणसांची चित्र आणि सॉक्स पपेट्स इत्यादी कलाप्रकार कविता बंकापुरे यांनी विद्यार्थ्यांना शिकविले. शिबिरामधून मुलांनी विविध कलाप्रकारांचा आनंद घेतला. अशी शिबिरे मुलांच्या मानसिक वृद्धीसाठी आणि कलात्मकतेची जाण निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाची ठरतात, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
----------
-rat12p10.jpg
21250
- रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात बोलताना विद्यार्थीनी.
-------------
फिनोलेक्स ॲकॅडमीमध्ये
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप
रत्नागिरी ः फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी भविष्यातील नोकरीच्या संधी समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे डीन अॅकॅडमिक्स डॉ. मिलिंद किरकिरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयातील अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून करमणुकीचे कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाला डीन फॅकल्टी डॉ. संजय कुलकर्णी, डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट डॉ. शशिकांत गोईलकर, फॅकल्टी इनचार्जे स्टुडन्ट अफेअर्स प्रा. डी. डी. जोशी, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनरल सेक्रेटरी पार्थ सावंत आणि मुक्ता कांबळे, समर्थ शिंदे तसेच मंथन पाटणे यांनी विशेष मेहनत घेतली.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57462 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top