चिपळूण ः जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गुलजार कुरवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गुलजार कुरवले
चिपळूण ः जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गुलजार कुरवले

चिपळूण ः जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी गुलजार कुरवले

sakal_logo
By

ratchl121.jpg
L21280
गुलजार कुरवले
---------------
जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कुरवले

चिपळूण, ता. १२ ः काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिरळ ग्रामपंचायतीचे सदस्य गुलजार कुरवले यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात गुलजार कुरवले यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. गेली अनेक वर्षे कुरवले हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची तालुका कार्यकारिणीतून जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी वर्णी लागली होती. नुकत्याच नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीत त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पक्षाने त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा दखल घेतली. पक्षाने माझ्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची नव्याने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मला पक्षवाढीसाठी जोमाने काम करावे लागेल, याची जाणीव आहे. आतापर्यंत ज्या निष्ठेने पक्षाचे काम केले, त्याच निष्ठेने कामय संघटनवाढीसाठी काम करत राहणार, असा निर्धार गुलजार कुरवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57469 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top