
रत्नागिरी- भजन डबलबारी
-rat12p11.jpg
21251
रत्नागिरीः भजनाच्या डबलबारीप्रसंगी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांचा सत्कार करताना भजन मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर. सोबत मान्यवर.
----------------
भजनाची डबलबारी; हिंदू व मुस्लिम एकतेची ललकारी
हिंदू व मुस्लिम भजनी बुवांमध्ये सामना रंगला; उपक्रमाचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता १२ ः एकीकडे भोंग्यावरून चाललेला वादंग आणि राजकारण तापलेले असताना रत्नागिरीतील आभार संस्था संचालित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवून आणले. हिंदू व मुस्लिम भजनी बुवांमध्ये भजनाची डबलबारी आयोजित करून एकतेचा संदेश दिला. स्वा. सावरकर नाट्यगृहात नुकतीच ही डबलबारी झाली.
या भारतभूमीला शेकडो वर्षाची परंपरा संगीत आणि साहित्य आणि त्यातून बहरलेले ईश्वरीय नामस्मरण ईश्वराची आळवणी म्हणजेच भजन आणि कव्वाली या स्वरुपात एकत्रितपणे नांदत आहेत. त्याच अनुषंगाने मंत्री उदय सामंत पुरस्कृत महाराष्ट्र राज्यात प्रथमच भजनसम्राट बुवा जहाँगीर शेख श्री गोसावी प्रासादिक भजन मंडळ (आतगांव केळशी, दापोली) आणि रायगडभूषण बुवा प्रसाद पाटील (डिकसळ ता. कर्जत जि. रायगड) यांच्यामध्ये रंगला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक अण्णा सामंत, कुमार शेट्ये, जनाब नुरमहम्मद धालवेलकर, भजनसम्राट भगवानबुवा लोकरे, दामोदर लोकरे, अनुज साळवी, सल्लागार डॉ. दिलीप पाखरे, आभारचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, भजन मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर शरद गोळपकर, ऐश्वर्या कीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला बशिर मुर्तुजा, लाईक फोडू यांनीही सहकार्य केले.
प्रास्ताविक वासुदेव वाघे यांनी केले. ओघवत्या शैलीत आणि मार्मिक भाषेत योगेश खडपे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामदास नाटेकर, शैलेश आंबेरकर, नीलेश कामेरकर, नीलेश मेस्त्री, मिलिंद आरेकर, संजय सुर्वे, एकनाथ शिंदे, प्रसाद राणे, धनंजय मोसमकर, निवास शिरगांवकर, सर्वता चव्हाण यांनी सौ. डावर, दादा वाडेकर आणि भजन मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.
..
चौकट
सामना प्रेम आणि ऐक्य फुलविणारा
हा कार्यक्रम विकास आणि मिलाफ यांचे ऐक्य असून सर्वाच्या प्रेमाचा धागा राष्ट्राला बळकट करते. डबलबारी भजनाचा सामना प्रेम आणि ऐक्य फुलविणारा आहे, असे उद्गार डॉ. पाखरे यांनी काढले. हा कार्यक्रम म्हणजे एकात्मिक बांधिलकीची आम्ही जपणूक करत आहोत, हा संदेशच आजच्या घडीला मोलाचा आहे, असे उद्गार साईनाथ नागवेकर यांनी काढले. अध्यक्षीय भाषण कुमार शेट्ये यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57470 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..