राजापूर-ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचीच टंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचीच टंचाई
राजापूर-ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचीच टंचाई

राजापूर-ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचीच टंचाई

sakal_logo
By

21298ः संग्रहीत
...
शिक्षकच अपुरे; विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे?

राजापूर तालुका; १९४ पदे रिक्त, गटशिक्षणाधिकारीही पाच वर्षे प्रभारीच
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून शाळांमध्ये विविध आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच अपुरे आहेत. त्यामुळे मुलांनी शिकायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तालुक्यामध्ये सद्यस्थितीमध्ये विविध प्रकारची शिक्षकांची तब्बल १९४ पदे रिक्त आहेत. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पदही पाच वर्षापेक्षा अधिक काळ प्रभारीच आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नियमित यावे, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाकडून मोफत पुस्तके, गणवेश आणि मध्यान्ह भोजनासारख्या योजना राबविल्या जात आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि बौद्धीक विकासाच्या वाढीसाठी खतपाणी देणारे शिक्षकच उपलब्ध करून दिले जात नाहीत. अनेक चार वर्गांच्या शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्या शिक्षकाने विद्यार्थ्याची शिकवणीही घ्यायची आणि दुसऱ्‍या बाजूला शाळेचे प्रशासकीय कामकाजही पाहायचे, अशी दुहेरी भूमिका वठवावी लागत आहे.
..
चौकट
ग्रामीण विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेवर अवलंबून
शहरी भागासारख्या खाजगी शाळा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी पूर्णपणे जिल्हा परिषदेच्या शाळेवर अवलंबून राहतो. शिवाय बहुतांश घरात शैक्षणिक वातावरण नसते. खासगी शिकवणीसुद्धा नसतात. अशा स्थितीत शाळेमध्ये शिक्षकही नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे ? असा प्रश्‍न आवासून ठाकला आहे.
------------------
चौकट
दृष्टीक्षेपात राजापूर शिक्षकसंख्या
संवर्ग*मंजूर पदे*कार्यरत*रिक्त
विस्तार अधिकारी*६*५*१
केंद्रप्रमुख*३४*५*२९
उपशिक्षक*६९६*६००*९६
पदवीधर*२५५*१८८*६७

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57471 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top