
आरोग्य सदर
आरोग्य सदर
swt1210.jpg
21282
सुनील आठवले
........
योग्य नियोजनाने लसीकरण यशस्वी
कोरोना लसीकरणाचे मोठे काम शासन पातळीवर हाताळले गेले. सुंदर नियोजन, योग्य व्यवस्थापन यामुळे ग्रामीण भागापर्यंत लसीचे व्यवस्थित वितरण झाले. यामुळे कोरोनाच्या तिसर्या लाटेला तोंड देणे सोपे झाले. केंद्राने लसीकरणाचा मोठा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.
- डॉ. सुनील आठवले, देवगड
......................
कोरोना लसीकरण करून केंद्राने लसीकरण हा एक मोठा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. हे कौतुकास्पद आहे. इतके सुंदर नियोजन, व्यवस्थापन आणि त्याचे वितरण ही काय साधीसोपी गोष्ट नव्हे. कोणत्या घटकांना लसीकरण आवश्यक आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्याला त्याचा पुरवठा करणे, त्याचे वितरण करणे, त्याचे योग्य पद्धतीने लसीकरण करणे ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. यासाठी केंद्रीय एजन्सीची भरपूर मदत झाली, असे म्हणतात. त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला. सर्वप्रथम देशात कोरोनाचे कोणते रुग्ण आहेत, त्याची माहिती संकलित करण्यात आली. कोरोना झालेले रुग्ण किती आहेत, त्याची माहिती जमा करण्यात आली. कोणत्या वयोगटातील रुग्ण आहेत, त्याचा अभ्यास करण्यात आला. कोणत्या आजाराने रुग्ण कसे गेले, याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर एक दिशा ठरविण्यात आली. सुरुवातीला ज्यांना या रुग्णाला तोंड द्यावे लागते, त्यांना लसीकरण करायचे ठरले. आता काहीतरी आधारभूत प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी आधारकार्ड, तो त्या ठिकाणी काम करतो, एवढा पुरावा हे महत्वाचे होते. अशांना लस दिल्यामुळे देशातील एक सैनिकी फळी सक्षम झाली. त्यानंतर रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्णांना लस देण्यात आली. असे टप्प्याटप्प्याने लसीकरण पार प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालयापर्यंत आणून वितरण झाले. इंजेक्शन आणायची आणि टोचायची असा विषय नव्हता. तर लस योग्य प्रमाणात दिली गेली पाहिजे. त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्याची साठवणुकीवर लसीची उपयोगिता कायम राहते. ही सक्षमता निर्माण करण्यासाठी संपूर्ण भारत सरकारकडे यंत्रणा तयार होती. त्याचा पुरेपूर फायदा आपल्या सगळ्या नागरिकांना झाला. सरकारी दवाखान्यात जायचे आणि इंजेक्शन टोचून घ्यायचे, ते देखील फुकट! तरीदेखील कित्येकांना त्याची काहीही किंमत नव्हती. परदेशातील ठिकाणी बघितले, तर लसीकरणासाठी जबरदस्त किंमत मोजावी लागत होती. आपल्याला ''घरपोच'' म्हणण्यापेक्षा ''दारापर्यंत'' योजना आली. अगदी छोट्या-छोट्या खेड्यात देखील लसीकरणचा पुरवठा झाला होता, तो देखील योग्य पध्दतीने. म्हणजेच त्या लसीची सक्षमता राखण्यात आली होती, याची कोणालाच कल्पना नसते. अनेक टप्प्यांतून लस येत असल्यामुळे त्याचा बॅच नंबर, त्याचे वितरण करणे, बारकोडप्रमाणे त्याच्या नोंदी ठेवणे, प्रत्येक विषयाला कुठला मिळाले त्याची ऑनलाईन नोंदणी करणे आणि त्याच्या उपयोगासाठी प्रमाणपत्र वितरित करणे, ही यंत्रणा एका रात्रीतून येऊ शकत नव्हती. पण फार जलदरित्या पूर्ण केल्यामुळे आपण तिसर्या लाटेला तोंड देऊ शकलो. अर्थात, त्याचे इतर फायदे अनेक झाले. इतर साथीचे आजार खूप कमी झाले. माणसे आपल्याकडची सक्षम झाली; परंतु याची किंमत खूप लोकांना आहे, असे नाही. ही शोकांतिका आहे. लसीचे दुष्परिणाम जरूर आहेत, नाही असे नाहीच; परंतु काही झाले की लसीला दोष देण्याचे प्रमाण आपल्याकडे फार आहे. याला अज्ञान असे म्हणता येणार नाही. अशिक्षितपणा म्हणावा, तर सुशिक्षित लोके सुद्धा काही निष्कर्ष काढतात. हातापायाला मुंग्या लागल्या, पोटात दुखायला लागले, तर लसीमुळे झाले, असे म्हणतात; मात्र ही गोष्ट इतर कारणांमुळे होऊ शकते, याचा विचार करणे आवश्यक आहे. यातून लस घेऊ इच्छिणाऱ्यांना नाउमेद करतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आज आंधळेपणाने कोणते निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. ज्यांनी कुणी अजूनही लसीकरण करून घेतलेले नसेल, त्यांना लसीकरण करून घेण्याचा आग्रह करावा. लसीकरण ही आपण फार मोठी लढाई जिंकली. त्यासाठी भारतीय सरकारचे जेवढे आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57473 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..