खासदार संभाजीराजेंच्या अवमानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार संभाजीराजेंच्या
अवमानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खासदार संभाजीराजेंच्या अवमानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खासदार संभाजीराजेंच्या अवमानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

sakal_logo
By

L२१२८३

- सिंधुदुर्गनगरी ः निवेदन सादर करताना कार्यकर्ते.

खासदार संभाजीराजेंच्या
अवमानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून छत्रपतींचे वंशज असलेल्या खासदार संभाजीराजे यांचा अवमान केल्याच्या घटनेचा निषेध करणारे निवेदन आज जिल्ह्यातील परिवर्तनवादी व आंबेडकरवादी जनतेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. यात संबंधित व्यवस्थापनाच्या विरोधात शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकांनी छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांना देवीच्या गर्भ गाभार्‍यात प्रवेश नाकारून त्यांचा अवमान केल्याची घटना घडली आहे. ही बाब अतिशय खेदजनक व दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध करणारे निवेदन जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनवादी व आंबेडकरवादी जनतेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांच्याकडे सादर केले. या घटनेबाबत संबंधित व्यवस्थापनाच्या विरुद्ध शासनाने कड़क कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्यासह प्रकाश चव्हाण, नंदन वेंगुर्लेकर, सुजित जाधव, नामदेव जाधव, पी. के. चौकेकर, शेषकुमार नाईक, शरद जाधव, मोतिराम चराठकर आदी उपस्थित होते.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57474 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top