चिपळूण-सिंधुरत्न योजनेतून लागवडीसाठी अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-सिंधुरत्न योजनेतून लागवडीसाठी अनुदान
चिपळूण-सिंधुरत्न योजनेतून लागवडीसाठी अनुदान

चिपळूण-सिंधुरत्न योजनेतून लागवडीसाठी अनुदान

sakal_logo
By

-ratchl123.jpg
21281
चिपळूण ः कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी बाबासाहेब पाटील.
-------------
सिंधु-रत्न योजनेतून लागवडीसाठी अनुदान

प्रशांत राऊत यांची माहिती; हळकुंडापासून रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण
चिपळूण, ता. १२ ः सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत किमान एक गुंठा ते १० गुंठापर्यंत लागवडीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील शेतकरी व समूहगटातील सदस्यांनी पंचायत समिती कृषी विभागाकडे मागणी अर्ज, सातबारा, आठ अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आदी कागदपत्रासह ग्रामपंचायतीची शिफारस घेऊन २० मे २०२२ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले.
सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत चिपळूण तालुक्‍यात या वर्षी खरीप हंगामात पंचायत समिती कृषी विभागाने एसके-४ या हळदीच्या हळकुंडापासून रोपे तयार करून लागवड करण्याचा नाविन्यपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पंचायत समिती सभागृहात झाले. प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकरी तसेच बचतगटाच्या सदस्यांनी हजेरी लावली. या कार्यशाळेस सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, लेखाधिकारी संदीप राजेशिर्के, सहाय्यक प्रशासन अधिकारी रमेश चौरे, कृषी अधिकारी बी. बी. पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर, कृषी विस्तार अधिकारी सुनील गावडे व अमोल पाटील आदींनी मार्गदर्शन केले. हळद लागवड करताना जमिनीची व बियाण्याची निवड करणे, बीजप्रक्रिया, खते व कीटकनाशकांचा सुयोग्य वापर तसेच पाणी व्यवस्थापन करून हळदीच्या रोपापासून उत्पादन घेण्याबाबत तसेच हळद काढणी पश्‍चात हळकुंडावर प्रक्रिया करून हळद पावडर तयार करणे व त्या मार्केटिंगबाबत माहिती दिली.
..
चौकट
७५ टक्केपर्यंत अनुदान मिळणार
सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे, खते आणि कीटकनाशके आदींसाठी सुमारे ७५ टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे. हळद लागवडीनंतर पुढे त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विभागनिहाय प्रोसेसिंग युनिट उभारण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियाउद्योगात महिला बचतगटांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त हळद लागड करावी, असे आवाहन बी. बी. पाटील यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57480 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top