गावतळे ः बिरुदेव सरगर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावतळे ः बिरुदेव सरगर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित
गावतळे ः बिरुदेव सरगर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित

गावतळे ः बिरुदेव सरगर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित

sakal_logo
By

बिरुदेव सरगर जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित

गावतळे, ता. १२ ः दिव्यांग हे अपंग नसतात, अपंग असतात, त्या समाजाच्या नजरा आणि समाजाच्या नजरा बदलून तालुक्यातील अपंग (दिव्यांग) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत झटणाऱ्‍या दापोली शिक्षण विभागात दिव्यांगांसाठी विशेषतज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या बिरुदेव सयाप्पा सरगर यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेतली. बुधवारी (ता. ११) आयसीटी तंत्रज्ञान दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट रत्नागिरी यांच्यावतीने जिल्हास्तर आदर्श बीआरसी सदस्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील, ज्येष्ठ अधिव्याख्याते शिवलकर, डॉ. संदीप पवार व नरेंद्र गावंड आदी उपस्थित होते. बिरुदेव सयाप्पा सरगर हे गेली अनेक वर्षे दापोलीत विशेषतज्ञ (दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी) कार्यरत असून त्यांच्या या उत्तम कामगिरीच्या प्रवासात दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव व गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक कल्याणी मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. दापोली शिक्षणविभागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी विशेष साधनव्यक्ती प्रकाश फडके, बुरटे, धनुगडे, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
---------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57481 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top