
वेंगुर्ले येथे शनिवारी गीतकार ठाकूर यांची मुलाखत
वेंगुर्ले येथे शनिवारी
गीतकार ठाकूर यांची मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः येथील किरात ट्रस्टने जानेवारीमध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून, शताब्दी वर्षानिमित्त शनिवारी (ता. १४) शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात विविध कार्यक्रमांसोबत वेंगुर्ल्याचे सुपुत्र व ख्यातनाम गीतकार गुरू ठाकूर यांची विशेष मुलाखत तसेच युवा पिढीतील उल्लेखनीय गायक, संगीतकार डॉ. प्रतिक गायकवाड यांची ''आवाज चांदण्यांचे'' ही संगीत मैफील रंगणार आहे.
येथील नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात ४ ते ८ या वेळेत होणाऱ्या या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन गीतकार ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रा. सुनील नांदोस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नीरजा माडकर व केतकी आपटे यांचा नृत्याविष्कार, राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत मसगे, कृष्णा मसगे आणि सहकारी यांचा कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, पखवाज वादक भाविका खानोलकर आणि हार्मोनियम वादक मयूर गवळी यांच्यासह बालदशावतार जुगलबंदीचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध वृत्त निवेदिका शिबानी जोशी गीतकार ठाकूर यांच्याशी मुलाखतीद्वारे संवाद साधणार आहेत. डॉ. गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या भावस्पर्शी संगीत मैफिलीने स्नेहमेळावा कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या शताब्दी स्नेहमेळाव्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ''किरात'' परिवारातर्फे केले आहे.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57483 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..