
संक्षिप्त
सावंतवाडीत उद्या
आरोग्य शिबीर
सावंतवाडी ः येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या संलग्न रुग्णालयात शनिवारी (ता.14) सकाळी दहा ते दोन या वेळेत मूळव्याध भगंदर व फिशर या आजाराच्या रुग्णांची मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी कोल्हापूर येथील तज्ञ डॉ. वीरधवल पाटील व सावंतवाडी येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. राजेश गुप्ता उपलब्ध राहणार आहेत. तरी सावंतवाडी परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी रुग्णालयाच्या बाह्य विभागात नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रा. डॉ. बाबासाहेब पाटील व अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी केले आहे.
------------------
पारपोलीत आजपासून विविध कार्यक्रम
सावंतवाडी ः पारपोली गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथाच्या वाढदिवसानिमित्त 13 व 14 ला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात शुक्रवारी (ता.13) सायंकाळी सात वाजता डबलबारी सामन्याचे आयोजन केले आहे. डबलबारीचा हा सामना मुंबई डोंबिवली वेस्ट येथील प्रसिद्ध बुवा मयूर दळवी व मळेवाड येथील सुप्रसिद्ध बुवा राकेश नाईक यांच्यात होणार आहे. 14 ला मंदिरात सकाळी आठ वाजता पूजा व अभिषेक, सकाळी 9 वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ओटी भरणे व नवस फेडणे, सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री 9 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचे सन्मान, रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा व त्यानंतर माऊली दशावतार मंडळ इन्सुली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. डबलबारी रसिक व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीनी केले आहे.
--------------------
मालवण-आडारीवाडीत आज कार्यक्रम
मालवण : मालवण-आडारीवाडी येथील श्री देव महापुरुष मंदिराचा 17 वा वर्धापन दिन उद्या (ता.13) साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी श्री देव महापुरुषाची विधिवत पूजा, सकाळी 10 वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुश्राव्य भजने, रात्री दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
--------------------
टीपः swt129.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - दांडेली ः विद्यालयाला वस्तू सुपूर्द करण्यात आले.
दांडेली विद्यालयास साहित्याचे वाटप
सावंतवाडी ः निरवडे येथील (कै.) उदय पांढरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दांडेलीतील माऊली कर्णबधीर विद्यालयाला पाच पंखे, ट्युबलाईट व क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे आणि संदीप पांढरे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापकांकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी सतीश तोरसकर, विजय धारगळकर, मुख्याध्यापक श्री. उकरंडे, श्री. आरोसकर आदी उपस्थित होते
............
L21257
ओळ - पाट ः चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर.
रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा
कुडाळ, ः पाट हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंध ग्रुपतर्फे रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कला विषयातून विविध चित्रकार निर्माण व्हावेत, या उद्देशाने ऋणानुबंध माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपतर्फे विविध क्षेत्रातील मुलांना मार्गदर्शन या करण्यात येते.
मुंबईतील भूषण तांडेल आणि त्यांचे सहकारी, तर पाट पंचक्रोशीमध्ये नुपूर सामंत आणि त्यांचे सहकारी या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. रंगभरण स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रज्योत मेस्त्री, शर्वरी वायंगणकर, कैवल्या चव्हाण, वैष्णव काळे, सौमित्र मळेकर, तर माध्यमिक गटात पार्थ गोसावी, योगेश सरमळकर, लाडू खोजुर्वेकर, दत्तराज ठाकुर, चंद्रकांत तुळसकर यांनी माध्यमिक गटात यश मिळविले. यशस्वी मुलांचे कौतुक करण्यासाठी ऋणानुबंध ग्रुपतर्फे शंकर शिरसाट (पाट), चित्रा नेरुरकर, गणेश ढवळे, श्रीहर्षा टेंगशे (कोचरा) हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित मुलांचे आणि विद्यालयातील उपक्रमांचे सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. कोरे, पर्यवेक्षक श्री. हंजनकर, कलाशिक्षक श्री. साळसकर उपस्थित होते.
.........
मुणगे-कारिवणेवाडीत १५ ला धार्मिक कार्यक्रम
मुणगे ः येथील कारीवणेवाडी, ब्राह्मणदेव प्रासादिक विकास मंडळाच्यावतीने ब्राह्मण देव मंदिर पुनर्बांधणीचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त १५ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मुणगे-कारिवणेवाडी येथील देव ब्राह्मण मंदिराची गेल्या वर्षी पुनर्बांधणी कारीवणेवाडी ब्राह्मणदेव प्रासादिक विकास मंडळ स्थानिक व मुंबई मंडळाच्या पुढाकाराने करण्यात आली. या मंदिराचा पुनर्बांधणीचा प्रथम वर्धापन दिन सोहळा ब्राह्मण देव मंदिरात होणार आहे. या निमित्ताने रविवारी (ता.१५) सकाळी ८ वाजता धार्मिक कार्यक्रम, सकाळी ११ वाजता मान्यवरांचा सत्कार, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ वाजता संगीत भजनाचा ( २०× २०), जंगी सामना निनादेवी प्रासादिक भजन मंडळ उंडिल (ता. देवगड) बुवा व्यंकटेश नर, पखवाज-सागर कदम, तबला-भावेश लाड, विरूध्द विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ परेल, मुंबईचे बुवा दुर्वास गुरव, पखवाज-नितीन घाडी, तबला-तुषार शिंदे यांच्यात होणार आहे. मुणगे ग्रामस्थ व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारिवणेवाडी, ब्राह्मणदेव प्रासादिक विकास मंडळाच्यावतीने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57484 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..