वेतोरे-वरचीवाडी उपसरपंचपदी सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेतोरे-वरचीवाडी 
उपसरपंचपदी सावंत
वेतोरे-वरचीवाडी उपसरपंचपदी सावंत

वेतोरे-वरचीवाडी उपसरपंचपदी सावंत

sakal_logo
By

swt1213.jpg
21290
वेतोरेः स्वप्नाली सावंत यांचे अभिनंदन करताना माजी उपसरपंच नाना वालावलकर व अन्य.

वेतोरे-वरचीवाडी
उपसरपंचपदी सावंत
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १२ ः तालुक्यातील वरचीवाडी-वेतोरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वप्नाली सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोमल नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सावंत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक ज्ञानेश्वर काळसेकर यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच राधिका गावडे, ग्रामपंचायत सदस्य कोमल नाईक, यशश्री नाईक, सविता जाधव, रघुनाथ वालावलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजयसिंह सावंत, वेतोरे सोसायटी चेअरमन विजय नाईक, सोसायटी सदस्य चंद्रकांत वालावलकर, यशवंत सावंत, गुंडू सावंत, गणपत राऊळ, जयराम शिरोडकर, सीताराम राऊळ, विश्वनाथ वालावलकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57485 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top