गुहागर ः डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात रोजगार मेळावा
गुहागर ः डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात रोजगार मेळावा

गुहागर ः डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात रोजगार मेळावा

sakal_logo
By

स्वावलंबी चारित्रपूर्ण शिक्षणयोजना ठरेल संजीवनी

नातू कॉलेजातील रोजगार मेळाव्यात जयसिंगराव मोरे यांचे मत
गुहागर, ता. १२ ः पदवीधर व उच्च पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व एन. ए. पी. एस. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वावलंबी चारित्रपूर्ण शिक्षणयोजना ही ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरेल, असे प्रतिपादन मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष जयसिंगराव मोरे यांनी केले. ते नातू महाविद्यालयाच्या रोजगार मेळाव्यात बोलत होते.
शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नसल्याने ग्रामीण भागातील युवापिढी शिक्षणापासून लांब जाऊ लागली आहे. त्याला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणामधून रोजगार कसे मिळतील, हा प्रयत्न मुंबई विद्यापीठ करत आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने एनएपीएस व महाराष्ट्र शासनाच्या अॅप्रेंटिस पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना विविध रोजगारभिमुख व्यवसायाचे मार्गदर्शन मिळण्यासाठी नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अॅप्रेंटिसबाबत संधी उपलब्ध होणार आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयांमध्ये सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्याला मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष जयसिंगराव मोरे, सर्व संचालक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री कदम, प्रा. डॉ. संगीता काटकर, प्रा. डॉ. सुरेश सुतार, प्रा. डॉ.सत्येंद्र राजे यांच्यासह आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
--------------
चौकट
कौशल्यानुसार रोजगाराची संधी
प्रा. प्रियांका गोयथळे यांनी सांगितले की, पदवीधर विद्यार्थ्याने एनएपीएस व महाराष्ट्र अॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्याला दररोज महाराष्ट्र व आजूबाजूच्या राज्यातील व्यवसायाच्या संधीबाबत अपडेट मिळत राहतील. जेणेकरून विद्यार्थी नोकरीसाठी तेथे अर्ज करून आपल्या कौशल्यानुसार रोजगाराची संधी प्राप्त करू शकेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीबाबत ही खरोखरच सुवर्णसंधी आहे. त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना नोकरी मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57486 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top