चिपळूण ः सात पथके घेतायत कुटुंबांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः सात पथके घेतायत कुटुंबांची माहिती
चिपळूण ः सात पथके घेतायत कुटुंबांची माहिती

चिपळूण ः सात पथके घेतायत कुटुंबांची माहिती

sakal_logo
By

चिपळूण पालिकाः लोगो
...
-rat12p23.jpg,
2L21299
...
खालील फोटो वाढाव्यात द्यावा
rat12p24.jpg
2L21300
- चिपळूण ः शहरात पालिकेने घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून अधिकारी कुटुंबीयांकडून माहिती घेत आहेत.
----------
आपत्ती व्यवस्थापनासाठी पूरबाधित क्षेत्रात सर्वेक्षण

शहरातील ११ प्रभागांत सात पथके घेतायत कुटुंबांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत बुधवारपासून (ता. ११) चिपळूण शहरातील पूरबाधित क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील ११ प्रभागांतील भागात ७ पथकांमार्फत कुटुंबांची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेत या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील ७ पथकांची नियुक्ती करण्यात आली. या पथकातील २० कर्मचारी २० मेपर्यंत पूरबाधित बाजारपेठ, भोगाळे, चिंचनाका, खेंड, पागमळा, बाजारपेठ, उक्ताड, गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप, देसाई मोहल्ला, वाणीआळी, मार्कंडी, मुरादपूर, काविळतळी, विरेश्वर कॉलनी, बहाद्दूरशेख आदी परिसरात सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणात पथकातील कर्मचारी घराघरांत जाऊन कुटुंबातील व्यक्ती, गरोदर माता, मुले, आजारी व्यक्ती, वयोवृद्धांची संख्या, मागील महापुरातील नुकसान, अचानक पाणी आल्यास तात्पुरती सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था आदी माहिती घेणार आहेत. मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे व विविध विभागांचे प्रमुख यांचे या पथकांना मार्गदर्शन केले जात आहे.
-----------
चौकट
मशिदी व मंदिरांमधील भोंग्यांद्वारेही धोक्याचा इशारा
पावसाळ्यात आपत्ती ओढावल्यास योग्य मदत तत्काळ व्हावी, यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. आपत्ती काळात नगर पालिकेच्या मुख्य इमारतीवरील भोंग्यासह गोवळकोट पाण्याची टाकी, पेठमाप, शंकरवाडी समाजमंदिर, लोकमान्य टिळक वाचनमंदिर आदी ठिकाणी बसवलेल्या भोग्यांचा वापर नागरिकांना सतर्क करण्यासाठी होणार आहे. याशिवाय मशिदी व मंदिरांमधील भोंग्यांद्वारेही नागरिकांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57489 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top