
चिपळूण-परशुराम घाटातील कामाची गती वाढवावी
- ratchl122.jpg
L21266
-चिपळूण ः परशुराम घाटातील कामाची पाहणी करताना शौकत मुकादम, सरपंच विकास गमरे आदी.
-------------
परशुराम घाटातील कामाची गती वाढवा
शौकत मुकादमांची मागणी; २५ मेपर्यंत सुरू होणे अशक्य?
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ ः मुंबई-गोवा-महामार्गाच्या चौपदरीकरणाचे परशुराम घाटात सुरू असलेले काम संथगतीने सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी घाटातील कामे मार्गी लागण्यासाठी येथे आवश्यक तेवढी यंत्रसामुग्रीही नाही. याच गतीने काम सुरू राहिले तर पावसाळ्यात घाट वारंवार बंद ठेवावा लागेल. सध्या घाटातील वाहतूक बंद करून काम सुरू आहे. यासाठी यंत्रसामुग्री वाढवून हे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी माजी सभापती व राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी केली आहे.
सुरवातीपासूनच पेढे-परशुरामवासीयांच्या विरोधामुळे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रेंगाळले होते. जागा, जमिनी, इमारतींचा मोबदला कोर्टात जमा आहे. तो संबंधित शेतकरी व जागामालकांना मिळालेला नाही. कुळ खोत व देवस्थानमध्ये भरपाईवरून तोडगा निघालेला नाही. यातच न्यायालयाने पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचे आदेश दिल्याने घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. त्यानुसार घाटात डोंगरकटाईचे काम रात्रंदिवस सुरू आहे. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करणे अवघड होणार आहे. याच मार्गावर परशुराम घाटात खरे तर कशेडी घाटाप्रमाणे बोगद्याची आवश्यकता असल्याचे शौकत मुकादम यांनी सांगितले; परंतु आता या मार्गाचे काम सुरू आहे. हे काम करताना अनंत अडचणी येत आहेत. दररोज येथे लहान-मोठे अपघात होत आहेत. वाहनचालकांची कोंडी होते. सध्या हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यानुसार पावसाळ्यापूर्वी एक मार्गिका चालू होणे अवघड आहे.
...
चौकट
संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करावे..
ठेकेदार कंपनीने २५ मे पासून घाट वाहतुकीस खुला करणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात तसे होईल, अशी स्थिती नाही. सध्या सुरू असलेल्या कामाला अधिक गती देणे आवश्यक आहे. येथे ठेकेदार कंपनीने मशिनरी वाढवायला हवी. शिवाय संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी काम आटोपले तर पावसात काही अंशी पेढे परशुराम ग्रामस्थांना दिलासा मिळेल, असा आशावाद मुकादम यांनी व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57490 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..